अनियमित हवामान असूनही भारताचा खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज, 150.50 दशलक्ष टन उत्पादनाची अपेक्षा

Despite erratic weather patterns, India forecasts record summer food grain output of 150.5 million tonne

India forecasts record summer food grain output : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अंदाज जाहीर केले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माहिती दिली की, खरीप हंगामात 150.50 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे अथक परिश्रम, शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे बंपर उत्पादन होत आहे. Despite erratic weather patterns, India forecasts record summer food grain output of 150.5 million tonne


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अंदाज जाहीर केले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माहिती दिली की, खरीप हंगामात 150.50 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे अथक परिश्रम, शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे बंपर उत्पादन होत आहे.

या अंदाजांनुसार, 2021-22 दरम्यान प्रमुख खरीप पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे.

अन्नधान्य – 150.50 दशलक्ष टन (विक्रमी)
तांदूळ – 107.04 दशलक्ष टन (विक्रमी)
पौष्टिक/भरड धान्य – 34 दशलक्ष टन
मका – 21.24 दशलक्ष टन
डाळी – 9.45 दशलक्ष टन
तूर – 4.43 दशलक्ष टन
तेलबिया – 23.39 दशलक्ष टन
भुईमूग – 8.25 दशलक्ष टन
सोयाबीन – 12.72 दशलक्ष टन
कापूस – 36.22 दशलक्ष गाठी (प्रति 170 किलो) (विक्रम)
ज्यूट आणि मेस्ता – 9.61 दशलक्ष गाठी (प्रति 180 किलो)
ऊस – 419.25 दशलक्ष टन (विक्रमी)

2021-22 साठी पहिल्या आगाऊ अंदाजानुसार (केवळ खरीप), देशातील एकूण अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी 150.50 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, हे गेल्या पाच वर्षांच्या (2015-16 ते 2019-20)च्या सरासरी अन्नधान्याच्या उत्पादनाच्या तुलनेत 12.71 दशलक्ष टन अधिक आहे.

2021-22 दरम्यान तांदळाचे एकूण उत्पादन 107.04 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या (2015-16 ते 2019-20) 97.83 दशलक्ष टनांच्या सरासरी उत्पादनापेक्षा हे 9.21 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

पौष्टिक/भरड धान्यांचे उत्पादन 34 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, जे 31.89 दशलक्ष टन सरासरी उत्पादनापेक्षा 2.11 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

2021-22 दरम्यान एकूण डाळींचे उत्पादन 9.45 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सरासरी 8.06 दशलक्ष टनांच्या खरीप डाळींच्या उत्पादनापेक्षा हे 1.39 दशलक्ष टन जास्त आहे.

2021-22 दरम्यान देशातील एकूण तेलबिया उत्पादन 23.39 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, जे 20.42 दशलक्ष टन सरासरी तेलबिया उत्पादनापेक्षा 2.96 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

देशातील ऊस उत्पादन 2021-22 दरम्यान 419.25 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. 2021-22 दरम्यान ऊस उत्पादन सरासरी 362.07 दशलक्ष टन ऊस उत्पादनापेक्षा 57.18 दशलक्ष टन जास्त आहे.

कापसाचे उत्पादन 36.22 दशलक्ष गाठी (170 किलो गाठी) आणि जूट आणि मेस्ताचे उत्पादन 9.61 दशलक्ष गाठी (180 किलो गाठी) असल्याचा अंदाज आहे.

Despite erratic weather patterns, India forecasts record summer food grain output of 150.5 million tonne

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण