Evergrande crisis : एका चिनी कंपनीमुळे जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचे 135 बिलियन डॉलर्सचे नुकसान, भारताला का होणार फायदा?, वाचा सविस्तर…

Worlds 500 richest lose 135 bn in global stock rout amid China Evergrande crisis

Evergrande Crisis : धनकुबेर एलन मस्कपासून जेफ बेझोसपर्यंत जगभरातील 500 श्रीमंतांचे एका चिनी कंपनीमुळे अब्जावधींचे नुकसान केले आहे. एका चिनी कंपनीच्या दुर्दशेमुळे जगभरातील शेअर बाजार दहशतीत आहेत. या कंपनीचे नाव आहे एव्हरग्रँड ग्रुप. सोमवारी भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्येही सुमारे 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीने जुलैनंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामुळे चिनी कंपनीबद्दल तसेच जगावर व भारतावर याचे काय परिणाम होणार हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. याची माहिती येथे देत आहोत.. Worlds 500 richest lose $135 bn in global stock rout amid China Evergrande crisis


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : धनकुबेर एलन मस्कपासून जेफ बेझोसपर्यंत जगभरातील 500 श्रीमंतांचे एका चिनी कंपनीमुळे अब्जावधींचे नुकसान केले आहे. एका चिनी कंपनीच्या दुर्दशेमुळे जगभरातील शेअर बाजार दहशतीत आहेत. या कंपनीचे नाव आहे एव्हरग्रँड ग्रुप. सोमवारी भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्येही सुमारे 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीने जुलैनंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामुळे चिनी कंपनीबद्दल तसेच जगावर व भारतावर याचे काय परिणाम होणार हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. याची माहिती येथे देत आहोत..

‘ब्लूमबर्ग क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिअल इस्टेट क्षेत्रावर चीन क्रॅकडाऊन आणि एव्हरग्रँडे समूहावरील कर्जाचे संकट यामुळे मंगळवारी आशियातील शेअर बाजारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. वॉल स्ट्रीटमध्येही घसरण दिसून आली. अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज आणि एस अँड पी 500 मध्ये 1.7% ची घसरण झाली. नॅस्डॅक इंडेक्सदेखील 2%पेक्षा जास्त खाली आला.

Evergrandeच्या दुर्देशेचे जगावर परिणाम

एव्हरग्रँडे ही चीनमधील एक मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनी चीनच्या 280 शहरांमध्ये 1300 हून अधिक प्रकल्पांवर काम करत आहे. कंपनीत सुमारे 2 लाख लोक काम करतात. पण सध्या कंपनीची अवस्था अत्यंत वाईट आहे.

कंपनीने आपले कर्जदार, पुरवठादार आणि गुंतवणूकदारांना तत्काळ आधारावर $ 350 अब्जचे कर्ज परत करणे बाकी आहे. पण कंपनीकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. कंपनीने 128 बँका आणि 121 बिगर बँकिंग संस्थांकडून पैसे घेतले आहेत. जर एव्हरग्रँडे बँकेला आणि त्याच्या सावकारांना वेळेवर पेमेंट करण्यात अपयशी ठरली, तर ते एक प्रकारची सायकल बनू शकते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही वर्षभरासाठी एखाद्या व्यक्तीकडून 1 कोटींचे कर्ज घेतले असेल. परंतु जर तुम्ही 1 वर्षानंतर त्याला ते कर्ज परत करू शकत नसाल तर ती व्यक्तीदेखील पुढे कोणालाही 1 कोटी देऊ शकणार नाही आणि ही सायकल सुरू होईल.

कंपनीचे एकूण देणे 1.97 ट्रिलियन युआन आहे. जे चीनच्या एकूण जीडीपीच्या 2% आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, हा आकडा का भीतिदायक आहे.

जगभरातील श्रीमंतांना फटका

सोमवारच्या अचानक घसरणीने जगभरातील बाजारांना फटका बसला, जवळपास 500 श्रीमंतांनी एकत्रितरीत्या तब्बल 135 अब्ज डॉलर्स गमावले.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, टेस्ला (टेस्ला इंक.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांचे सर्वात मोठे नुकसान झाले, कारण त्यांनी 7.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आणि आता त्यांची संपत्ती 198 अब्ज डॉलरवर आली आहे. अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचे दुसरे सर्वात मोठे 5.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, ज्यामुळे त्यांची संपत्ती 194.2 अब्ज डॉलरवर आली आहे.

ब्लूमबर्ग रँकिंगनुसार, एव्हरग्रँडेचे संस्थापक आणि चेअरमन हू का यान यांच्या संपत्तीत तीव्र घट झाली, कारण कंपनीचे शेअर्स एका दशकातील सर्वात कमी पातळीवर आले. 2017 मध्ये 42 अब्ज डॉलर्सवर गेलेले त्यांची संपत्ती आता 7.3 अब्ज डॉलरवर आली आहे.

हाँगकाँगच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी डेव्हलपर्सचे हाँगकाँगच्या हँग सेंग इंडेक्समध्ये सर्वात जास्त नुकसान दिसून आले. अब्जाधीश ली शौ-की, यांग हुआयन, ली का-शिंग आणि हेन्री चेंग यांनी मिळून 6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गमावले.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Pinduoduo Inc. कॉलिन हुआंगचे संस्थापक या वर्षी $ 29.4 अब्ज गमावले आहेत.

जगाची 2008 सारख्या मंदीकडे वाटचाल?

याबाबत जिओजितचे व्ही के विजयकुमार म्हणतात की, “अनेकांनी शंका व्यक्त केली आहे की, ही चीनसाठी लेहमन मोमेंट तर ठरणार नाही ना? परंतु सध्यातरी असे वाटत नाही, कारण एव्हरग्रँडेचे कर्ज व्यापक नाही. यूएस डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेजमधील रिकव्हरी हे बाजारातील आत्मविश्वासाचे लक्षण आहे. यावरून ही जागतिक समस्या नसल्याचे दिसते. पण तरीही गुंतवणूकदारांनी सावध असले पाहिजे, कारण बाजाराची व्हॅल्यूएशन खूप जास्त आहे आणि म्हणूनच बाजारात सुधारणा होऊ शकते. एव्हरग्रँडे संकटाचा अंतिम परिणाम अद्याप दिसला नाही आणि याविषयी योग्य माहिती होणे बाकी आहे.”

2008 चे आर्थिक संकट लेहमन मोमेंट म्हणून ओळखले जाते. बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या परिस्थितीसंदर्भात जागतिक स्तरावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे जर चीनमध्ये असे काही घडले तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.

भारताला काय फायदा?

भारताच्या शेअर बाजारावर होणाऱ्या परिणामावर, व्ही के विजयकुमार म्हणाले की, चीन सरकारकडून स्वतःच्या कंपनीवर प्रथम नियामक कारवाई आणि आता एव्हरग्रँडे संकट. ही भारतासाठी चांगली चिन्हे आहेत, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत कॅश फ्लो वाढला आहे आणि मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Worlds 500 richest lose $135 bn in global stock rout amid China Evergrande crisis

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात