”काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच एवढा काळ सत्तेबाहेर आहे, त्यामुळेच…” केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशींनी लगावला टोला!

Rahul Gandhi Prallhad Joshi

संसदेत बोलू दिले जात नसल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

प्रतिनिधी

 राहुल गांधींनी केंब्रिजच्या लेक्चर मध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी हॉलमध्ये दिलेल्या लेक्चर मध्ये भारतीय संसदेत विरोधकांचा माईक बंद केला जातो. त्यांचा आवाज दाबला जातो, असा दावा केला आहे. यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवाय राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राहुल गांधींच्या या आरोपावर केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.Union Minister Pralhad Joshi responded to Congress leader Rahul Gandhi criticism

प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘’काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच एवढा काळ सत्तेबाहेर आहे, त्यामुळेच त्यांनी मानसिक संतुलन गमावले आहे.’’ तसेच, ”राहुल गांधींनी म्हटले की, संसदेत त्यांना बोलू दिलं जात नाही. संसदेत जेव्हा ते बोलत होते तेव्हा ते बिनुडाचे आरोप करत होते. जेव्हा त्यांना पुरावा मागण्यात आला तेव्हा त्यांनी काहीच सादर केले नाही. सभापती आणि अध्यक्षांवर असे आरोप करणे दुर्दैवी आहे.’’ असंही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.


घातसूत्र : भारतातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे सरसावली ब्रिटन मधली लेबर पार्टी!!


राहुल गांधींचा ब्रिटन दौरा यशस्वी करण्यासाठी लेबर पार्टीचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी ब्रिटिश संसदेच्या पार्लमेंटच्या ग्रँड कमिटी रूम मध्ये राहुल गांधींचे लेक्चर ठेवले होते. येथे देखील राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचाच डंगोरा पिटला. भारतात संसदेत देखील विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. त्यांचे माईक बंद केले जातात. भारतात जीएसटी, नोटबंदी, चीनचे अतिक्रमण यासारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करायला बंदी आहे, असा दावा राहुल गांधींनी ग्रँड कमिटी रूम मध्ये केला. राहुल गांधींच्या या लेक्चरसाठी सुमारे 90 खासदार उपस्थित होते.

राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यावर विहिंपने टीका केली आहे.

Union Minister Pralhad Joshi responded to Congress leader Rahul Gandhis criticism

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात