पंतप्रधान मोदींचा आसाममधील गुवाहाटीत आज(मंगळवार) जोरदार रोड शो झाला. यावेळी पंतप्रधानांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या नागरिकांनी पंतप्रधांन मोदींचे गुलाल व फुलं उधळून जल्लोषात स्वागत केले. रोड शो वेळी पंतप्रधान मोदी कारच्या पुढील सीटवर बसलेले होते. Modi road show in Assam Guwahati A grand welcome from the people
पंतप्रधान मोदी ७ मार्चपासून ईशान्येच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मोदींनी मेघालय आणि नागालँडच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर ते आसामध्ये पोहचले, जिथे त्यांचा हा रोड शो झाला. आसामचे आरोग्य मंत्री केशव महंता यांनी सांगितले की, पंतप्रधान राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल.
काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच एवढा काळ सत्तेबाहेर आहे, त्यामुळेच…; केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशींनी लगावला टोला!
माणिक साहा यांच्या शपथविधीला पंतप्रधान उपस्थित राहणार –
पंतप्रधान बुधवारी सकाळी ९.४० वाजता त्रिपुरासाठी रवाना होतील. येथे ते माणिक साहा सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील. साहा यांना त्रिपुरातील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित करण्यात आले आहे. नागालँडमध्ये नेफियू रिओ आणि मेघालयमध्ये कॉनराड संगमा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नेफियू रिओ यांनी दुपारी १.४५ वाजता पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर संगमा यांचा शपथविधी सकाळी ११ वाजता झाला. संगमा कॉनराड दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्री बनले आहेत. या दोघांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App