Twitter ने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक हँडलवरून ब्लू टिक हटवली, थोड्याच वेळात रिस्टोर केली, संघाच्या अनेक नेत्यांचे हँडल अद्यापही अनव्हेरिफाइड

twitter removes blue badge from vice president venkaiah naidu personal verified account then restored

twitter removes blue badge : नव्या आयटी नियमांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने भारताचे राष्ट्राध्यक्ष एम. वेंकैया नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकले. मात्र, हा वाद उफाळून येताच ट्विटरला वेंकैय्या नायडूंच्या हँडलवरील ब्लू-टिक पुन्हा सुरू करावी लागली. तथापि, उपराष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकृत हँडलवर आधीपासूनच ब्लू टिक आहे. वृत्तसंस्थेनुसार, नायडू यांचे खाते गेल्या कित्येक महिन्यांपासून सक्रिय नव्हते. यामुळे त्यांचे वैयक्तिक हँडल अनव्हेरिफाय करण्यात आले. twitter removes blue badge from vice president venkaiah naidu personal verified account then restored


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या आयटी नियमांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने भारताचे राष्ट्राध्यक्ष एम. वेंकैया नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकले. मात्र, हा वाद उफाळून येताच ट्विटरला वेंकैय्या नायडूंच्या हँडलवरील ब्लू-टिक पुन्हा सुरू करावी लागली. तथापि, उपराष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकृत हँडलवर आधीपासूनच ब्लू टिक आहे. वृत्तसंस्थेनुसार, नायडू यांचे खाते गेल्या कित्येक महिन्यांपासून सक्रिय नव्हते. यामुळे त्यांचे वैयक्तिक हँडल अनव्हेरिफाय करण्यात आले.

संघाच्या अनेक नेत्यांची खातीही अनव्हेरिफाइड

आरएसएसच्या अनेक नेत्यांची खाती अनव्हेरिफाय करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या अनेक नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटसलादेखील ट्विटरने अनव्हेरिफाय केले. यामध्ये अरुण कुमार, भैय्याजी जोशी आणि सुरेश सोनी अशी मोठी नावे आहेत. तथापि, सध्या संघ प्रमुख आणि सरकार्यवाह यांच्या खात्यावर व्हेरिफाइड टिक दाखवत आहे. दरम्यान, भाजप मुंबईचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी ट्विटरच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी याला भारतीय संविधानावर हल्ला म्हटले.

ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांच्या ट्विटर अकाउंटला अनव्हेरिफाइड (unverified) केले आहे. वास्तविक, ट्विटरने उपराष्ट्रपती नायडूंच्या खासगी ट्वीटर हँडलवरून व्हेरिफाइड ब्लू टिक हटवली आहे.

तथापि, उपराष्ट्रपती @VPSecretariat यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ब्लू टिक आहे आणि याचे 9.3 लाख फॉलोअर्स आहेत. तर व्यंकय्या नायडू यांच्या खासगी ट्विटर हँडलवर 1.3 लाख फॉलोअर्स आहेत.

ट्विटर कोणत्या परिस्थितीत हटवतो ब्लू टिक

Twitter च्या अटींनुसार, जर एखादी व्यक्ती आपल्या हँडलचे नाव बदलते किंवा मग युजर आपल्या अकाउंटचा ज्या आधारावर व्हेरिफाय करण्यात आले, त्याप्रकारे वापर करत नाही, तेव्हा अशा परिस्थितीत ब्लू टिक म्हणजेच blue verified badge हटवते.

ट्विटरची देशाच्या उपराष्ट्रपतींना चुकीची वागणूक

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरून व्हेरिफिकेशन हटवल्याने आयटी मंत्रालय नाराज आहे. ट्विटरने देशाच्या क्रमांक दोनच्या अथॉरिटीसोबत असा व्यवहार केला आहे. ट्विटरला भारताचे संयम जोखण्याची इच्छा आहे काय, असा प्रश्न यावरून पडला आहे. याप्रकरणी ट्विटरचा युक्तिवाद चुकीचा आहे, भारत सरकार या प्रकरणावर कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

twitter removes blue badge from vice president venkaiah naidu personal verified account then restored

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात