Maharashtra Unlock ! अखेर ठरले…महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक ; ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार ; मध्यरात्री नियमावली जाहीर


  • पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?
  • औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहिसा आटोक्यात येत आहे. त्यामूळे येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.विजय वडेट्टीवार यांची अनलॉकची घोषणा आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेला यू-टर्न यावरुन महाराष्ट्रात लॉकडाउन की अनलॉक हा निर्माण झालेला संभ्रम अखेरीस संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने अनलॉकची नियमावली काल मध्यरात्री जाहीर केली असून सोमवारी ७ जूनपासून ही नियमावली लागू केली जाणार आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी हा आदेश काढला आहे. MAHARASHTRA UNLOCK ! Maharashtra governments final Unlock Order from 7 th June : Read details

या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

 

आठवड्याच्या सरासरीनुसार, भरलेल्या ऑक्सिजन बेडचं प्रमाण आणि रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर या आधारे जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढणार आहेत. परंतू या दोन निकषांच्या आधारावर नियम कसे असतील हे राज्य शासनाने निश्चीत केलंय. दोन निकषांच्या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करुन नियमावलीनुसार निर्बंध गरजेनुसार कडक किंवा शिथील केले जाणार आहेत. यासाठी एकूण पाच स्तर निश्चीत करण्यात आले आहेत.

सरकारी नियमाप्रमाणे असे असतील पाच स्तर –

१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे

२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे

५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे

कुठल्या स्तरावर काय-काय सुरु होणार?

पहिला स्तर – या भागात सर्व प्रकारची दुकानं सुरु होणार. मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह देखील सुरळीत सुरु राहतील. रेस्टॉरंट्सनाही परवानगी असेल. लोकलसेवा ही सुरळीत होईल मात्र परिस्थितीनुरुप स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुन्हा निर्बंध घालण्याची मूभा असेल.

याव्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणं खुली राहतील, मैदानं खुली राहतील, वॉकिंग-सायकलिंगला परवानगी, सर्व खासगी कार्यालयं उघडण्याची परवानगी, शासकीय कार्यालयं १०० टक्के क्षमतेने, विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतीक, मनोरंजन कार्यक्रमांना मुभा, लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर बंधन नसतील, जीम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होऊन जमावबंदी नसेल.

दुसरा स्तर – दुकानं पूर्णवेळ सुरु राहतील, मॉल-थिएटर्स-मल्टिप्लेक्स-नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील, रेस्टॉरंटनाही ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्याची परवानगी, लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी, सार्वजनिक ठिकाणं-मैदानं खुली राहतील, वॉकिंग-सायकलिंगला परवानगी, खासगी कार्यालयं उघडण्याची मूभा, सरकारी कार्यालयही १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

याव्यतिरीक्त विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ ही वेळ असेल, चित्रीकरण नियमितपणे करता येईल, सामाजिक-सांस्कृतीक,मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांना परवानगी असेल, अत्यंविधी-बैठका-निवडणूक यासाठी बंधन नसतील, जीम-सलून-स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी, सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरु राहील पण आसनक्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करु शकतात. या भागांत जमावबंदी लागू असेल.

तिसरा स्तर – संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्क दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.

चौथा स्तर – अत्यावश्यक सेवेतील दुकानं चार वाजेपर्यंत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं पूर्णपणे बंद राहतील.

पाचवा स्तर – अत्यावश्यक सेवेतील दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार-रविवार मेडीकल वगळता सर्व दुकानं बंद राहतील. याचसोबत तिसरा, चौथा आणि पाचव्या स्तरात इतर निर्बंधही कायम राहणार आहेत.

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे 

पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात ६  जिल्हे

तिसरा १० जिल्हे

चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे? 

मुंबई -मुंबई उपनगर-अहमदनगर-अमरावती-हिंगोली-नंदुरबार

तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे?
अकोला-बीड-कोल्हापूर-उस्मानाबाद-रत्नागिरी-सांगली
-सातारा-सिंधुदुर्ग

चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

पाचवा टप्पा-रेड झोनमध्ये

पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये

ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील

५ वा टप्पा नेहमी रेड झोनमध्ये असेल

MAHARASHTRA UNLOCK ! Maharashtra governments final Unlock Order from 7 th June : Read details

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात