गोकुळधाम सोसायटीत आनंदी आनंद! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये नोंद


विशेष प्रतिनिधी

मुंबई : टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेने १३ वर्षांपासून प्रेक्षकांना खदखदून हसवले आहे. या मालिकेची लोकप्रियता संपूर्ण जगभर आहे. अशातच आता या मालिकेने एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. ३००० पेक्षा अधिक एपिसोड पूर्ण केल्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेनंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सर्वाधिक एपिसोड असणारी मालिका आहे. Tarak Mehta’s Inverted Glasses’; Recorded in the Guinness Book of World Records

मात्र, असे असले तरीही सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकेच्या यादीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने अव्वलस्थान पटकावले आहे. त्यामुळे आता ही मालिका आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंदवण्यास सज्ज झाली आहे.

मालिका गुजराती मॅगझिन चित्रलेखाचा स्तंभ ‘दुनिया ने उंधा चष्मा’वर आधारित आहे. ही मालिका सन २००८ मध्ये सब टीव्हीवर प्रसारित झाली होती. अद्याप ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये.

टीव्हीवर सर्वाधिक एपिसोड असलेल्या टॉप- १० मालिका

ये रिश्ता क्या कहलाता है
स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका १२ जानेवारी, २००९ रोजी सुरू झाली होती. या मालिकेने आतापर्यंत ३३९५ एपिसोड पूर्ण केले आहेत. यानंतर या मालिकेने सर्वाधिक एपिसोड असणाऱ्या हिंदी मालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा
दयाबेनच्या मालिका सोडण्याच्या आणि पुनरागमन करण्याच्या वादामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने आपले ३१७८ एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेची सुरुवात सन २००८ मध्ये झाली होती. या मालिकेचे विशेष म्हणजे सर्वात ही मालिका टीव्हीवरील सर्वात जुनी असणारी मालिका बनली असून अद्याप सुरू आहे.

बालिका वधू
‘बालिका वधू’ या मालिकेची सुरुवात कलर्स वाहिनीसोबतच झाली होती. ही मालिका २१ जुलै, २००८ रोजी सुरू झाली होती. सन २०१६ साली या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला होता. या मालिकेने आपले २२४५ एपिसोड पूर्ण केले होते. कलर्सवरील सर्वाधिक चालणारी मालिका म्हणून ‘बालिका वधू’ची ओळख आहे.

साथ निभाना साथिया
‘साथ निभाना साथिया’ मालिकेची सुरुवात ३ मे, २०१० रोजी झाली होती. या मालिकेने आतापर्यंत आपले २१२५ एपिसोड पूर्ण केले आहेत.

ससुराल सिमर का
दीपिका कक्कर आणि अविका गौर अभिनित ‘ससुराल सिमर का’ मालिकेचा पहिला एपिसोड २५ एप्रिल, २०११ रोजी प्रदर्शित झाला होता. तब्बल २०६३ एपिसोडनंतर २ मार्च, २०१८ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला होता. याचा दुसरा भाग सुरू झाला आहे.

ये है मोहब्बतें
दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल अभिनित ‘ये है मोहब्बतें’ ही मालिका ३ डिसेंबर, २०१३ ते १८ डिसेंबर, २०१९ पर्यंत चालली. या मालिकेने आपले १८९५ एपिसोड पूर्ण केले होते.

क्योंकि सास भी कभी बहू थी
एकता कपूरची पहिली मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ने हिंदी टीव्हीचा अर्थच बदलला होता. या मालिकेचा पहिला एपिसोड ३ जुलै, २००० रोजी प्रदर्शित झाला होता. या मालिकेचा शेवटचा एपिसोड ६ नोव्हेंबर, २००८ रोजी प्रदर्शित झाला होता. या मालिकेने १८३३ एपिसोड पूर्ण केले होते.

कुमकुम भाग्य
झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका १५ एप्रिल, २०१४ रोजी सुरू झाली होती, जी आतापर्यंत सुरू आहे. या मालिकेने आतापर्यंत १८४५ एपिसोड पूर्ण केले आहेत.

कहानी घर घर की
‘कहानी घर घर की’ या मालिकेची सुरुवात १६ ऑक्टोबर, २००० रोजी झाली होती. तब्बल १६६१ एपिसोडनंतर ९ ऑक्टोबर, २००८ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला होता.

उतरन
तब्बल १५४९ एपिसोडसोबत ‘उतरन’ मालिका ही ‘बालिका वधू’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकांनंतर कलर्स वाहिनीवरील तिसरी सर्वाधिक चालणारी मालिका आहे. या मालिकेची सुरुवात १ डिसेंबर, २००८ रोजी झाली होती. यानंतर १६ जानेवारी, २०१५ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता.

 

Tarak Mehta’s Inverted Glasses’; Recorded in the Guinness Book of World Records

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण