निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale

Pandarpur Vari : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे. Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे.

भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले म्हणाले की, यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी यावर वेळकाढूपणा न करता त्वरित वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे लवकरच अनलॉकही होण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांच्या मागणीवर आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात