Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. या अनुषंगाने बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाद्वारे विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेटे यांनी दिली आहे. Maratha Reservation rally in beed Tomorrow Says Vinayak Mete
विशेष प्रतिनिधी
बीड : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. या अनुषंगाने बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाद्वारे विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेटे यांनी दिली आहे.
तत्पूर्वी, विनायक मेटे यांनी गत महिन्यात राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून अल्टिमेटम दिला होता, आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कडक लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी अनलॉक झाल्यावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात अद्यापही अनलॉकचा निर्णय जाहीर झालेला नाही. यावर मेटे म्हणाले की, प्रशासनं प्रशासनाचं काम करतंय आम्ही आमचं काम करतोय, उद्या मोर्चा निघणार आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.
मेटे पुढे म्हणाले की, बीडचा मोर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे मोर्चे निघतील. पुढच्या आंदोलनाची दिशा उद्याच्या मोर्चात जाहीर करण्यात येईल. सरकारला अल्टीमेटम द्यायची वेळ संपलीये, आम्ही काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील. बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Maratha Reservation rally in beed Tomorrow Says Vinayak Mete
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App