गोव्यामध्ये मगोप-तृणमूल युतीवर अखेर शिक्कामोर्तब


विशेष प्रतिनिधी

पणजी – गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एकत्रित आल्याची घोषणा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पणजीत केली.
जाहीर सभेत त्या बोलत होत्या.TMC and MGP get alliance in Goa

भाजपने देशातील सरकारी मालकीच्या अनेक संस्था, कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. भाजप देश विकून खात आहे, असे दावे त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपची दादागिरी यापुढे आम्हाला नको आहे.



भाजपला निवडणुका जवळ आल्या की माँ गंगा आठवते, गंगेत डुबकी मारली जाते. हे उत्तराखंडमध्ये गुहेत जातात. एरवी मात्र कोरोना रुग्णांचे मृतदेह गंगेत टाकून गंगा अपवित्र केली जाते. हीच परिस्थिती सर्वत्र आहे. भाजपकडून केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली जाते.

उलट बांगलादेशामधील व्हिडिओ बंगालचे व्हिडिओ म्हणून पसरवले जातात. तृणमूल सर्व जाती-धर्मांना समान मानतो. सर्व जाती-धर्मांतील लोकांचा सन्मान करतो. हे भाजपने कधीच केले नाही. त्यांना जाती-धर्मांत भांडणे हवी आहेत.

TMC and MGP get alliance in Goa

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात