मेंदूचा शोध व बोध : मुलांचा अभ्यास हा प्रॉडक्टिव हवा, पॉझिटिव्ह हवा


कोरोना कमी झाला असला तरी शाळांतील शिक्षण अजून पूर्णतः सुरु झालेले नाही. अशा वेळी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत ती अधिकची भिती पालकांना सतावत आहे. अशा वेळी पालकांनी काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. अभ्यास प्रॉडक्टि.ह हवा, पॉझिटिव्ह हवा. रोजच्या अभ्यासाचंही कंटाळवाणं रुटिनच व्हायला हवं, असं नाही. मुलांना अभ्यासही मजेत करता येईल, अशा युक्त्या पालकांनी शोधाव्यात.How your children study is important. Pay close attention to it

मुलं अभ्यास किती वेळ करतात, यापेक्षा तो कसा करतात, हे महत्त्वाचं. अभ्यासाला नुसतंच बसणं वेगळं आणि अभ्यासात लक्ष असणं वेगळं. तासभर मुलांचं अभ्यासाकडं पुरतं लक्ष असेल खरं तर तेवढंच ते असू शकतं तर ती चांगला अभ्यास करतील. चार तास बसूनसुद्धा एकच तास अभ्यासाकडं लक्ष लागणार असेल, तर तीन तास फुकटच. त्यासाठी केलेला आटापिटा, आरडाओरडाही फुकट. हा चार तासांचा अभ्यास नव्हे आभास झाला. त्याऐवजी तासभर अभ्यास, एखादा तास छंदासाठी आणि दोन तास खेळायला दिलं,

तर रोज तासभराचा अभ्यास हा खरा चांगला आणि मनापासून होईल. मुलांचा नुसता चांगला अभ्यासच नव्हे, तर चांगला सर्वांगानं विकासही होऊ शकंल. मुलं अभ्यास करताना तीन मार्गांनी ज्ञान मिळवत असतात. एक वाचन करून, दुसरं ऐकून, तिसरं प्रत्यक्ष अनुभव घेऊन. या तिन्ही प्रकारातला एक प्रकार मुलं जरा जास्त प्रमाणात वापरताना दिसतात.

आपल्या मुलाचा अभ्यासाचा प्रकार कोणता ते पालकांनी पाहावं आणि त्याप्रमाणे अभ्यासावर भर द्यावा. अर्थात, वाचनाइतकंच लेखन, त्याचा सराव महत्त्वाचा. वाचन म्हटलं, तरी प्रत्येकाची अभ्यासाची रीत वेगळी असते. कुणी मनात वाचतं, कुणाला मोठ्यानं वाचून लक्षात राहतं. मुलांची नेमकी पद्धत कोणती, कुठल्या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे चांगला होतो, हे ओळखायला मुलांना मदत करावी.

How your children study is important. Pay close attention to it

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था