गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २० हजारांना वाढला. ६८ टक्यांची वाढ नोंदविली गेली. शेअर बाजारात निर्देशांकाच्या पातळीवर तेजी असताना शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात महिन्याला १३ लाख नवीन डिमॅट अकाऊंटस उघडली गेली आहेत.The stock market has also risen, with an average of 1.3 million new demat accounts per month last year, bringing the number of investors to 6.97 crore.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २० हजारांना वाढला. ६८ टक्यांची वाढ नोंदविली गेली. शेअर बाजारात निर्देशांकाच्या पातळीवर तेजी असताना शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात महिन्याला १३ लाख नवीन डिमॅट अकाऊंटस उघडली गेली आहेत.
शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे असते. ही डिमॅट अकाऊंट मोठ्या प्रमाणावर उघडली जात आहेत. गेल्या वर्षभरात दर महिन्याला १३ लाख नवीन डिमॅट अकाऊंटस सुरू झाली आहेत. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्याची संख्या तब्बल ६.९७ कोटीपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या वर्षी २०२० च्या मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना जागतिक महामारी असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी शेअर बाजारात प्रचंड पडझड झाली होती. तब्बल ३५ टक्यांनी शेअर बाजार कोसळला होता. मात्र, जूननंतर परिथिती सुधारू लागली.
कदाचित संकटात संधी शोधणाºयांची संख्या वाढल्याने अनेक जण शेअर बाजारात सक्रीय झाले. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये शेअर बाजार ६८ टक्यांनी वाढला. २००८-०९ नंतरचा हा विक्रम आहे. त्यावेळी शेअर बाजार ८० टक्यांनी वाढला होता.
गेल्या चौदा महिन्यात ब्रोकरेज आणि एक्सचेंजर्सकडे १२ ते १५ लाख नवी गुंतवणूकदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात गुंतवणूक असणाऱ्यांची संख्या ६.९७ कोटी झाली आहे,
असे मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष कुमार चौहान यांनी सांगितले.यापैकी ४० टक्के नवी डीमॅट अकाऊंट मुंबई शेअरी बाजाराच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सुमारे ६.९ कोटी गुंतवणूकदारांपकी एक चतुर्थांश महाराष्ट्रातील आहेत. त्यांची संख्या दीड कोटींहून अधिक आहे. त्यापाठोपाठ ८६ लाख गुजरातमधील आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल बॅकींगमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिक आता गुंतवणूक करू शकत आहेत.
त्यामुळेच गुजरात आणि महाराष्ट्रानंतर आता गुंतवणूकदारांच्या संख्येत उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संख्या ५२.३ लाक आहे. चौथ्या क्रमांकावर ४२.३ लाख गुंतवणूकदारांसह तामीळनाडू आणि पाचव्या क्रमांकावर ४२.२ लाख संख्येसह कर्नाटक आहे.
बंगालमध्ये ३९.५ लाख, दिल्ली ३७.३ लाख, आंध्र प्रदेश ३६ लाख, राजस्थान ३४.६लाख, हरियाणा २१.२ लाख, तेलंगणा २०.७ लाख, केरळ १९.४ लाख, पंजाब १५.२ लाख आणि बिहारमध्ये १६. ५ लाख गुंतवणूकदार आहेत.
तज्ज्ञांच्या मते लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे लोकांना शेअर बाजारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळू मिळाला. दैनंदिन कामामुळे यापूर्वी हे करणं त्यांना अशक्य वाटत होते. शेअर बाजारात रस असलेल्या अनेकांना कार्यालयामुळे सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शेअर बाजारावर नजर ठेवता येणं शक्य नव्हते.
त्याचबरोबर आता गुंतवणूकदार केवायसीच्या माध्यमातून काही मिनिटांत डिमॅट खाती उघडतात. सेबीने ई-साइन आणि डीजी-लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे प्रथमच गुंतवणूकदारांना त्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवत लवकर नोंदणी करण्यास मदत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App