विरोधी ऐक्याला सुरुंग; नितीश कुमारांनी 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक रद्द!!


वृत्तसंस्था

पाटणा : देशात इकडे तिकडे तोंडे असलेल्या सर्व विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक रद्द करून टाकली आहे. स्वतः नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. The meeting called by Nitish Kumar on June 12 in Patna was cancelled

नितीश कुमार यांनी गेल्या महिन्याभर बिहारचा कारभार सोडून वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यापासून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत सर्व नेत्यांचा समावेश होता. त्यांना भाजप विरोधी एकजुटीसाठी कन्व्हिन्स केले होते. सुरुवातीला हे सर्व नेते राजी झाले पण त्यानंतर नितीश कुमार यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली पाटण्यात बैठक बोलावली तेव्हा मात्र सर्व विरोधी पक्षांनी प्रमुख नेते बैठकीला पाठवण्याच्या ऐवजी पक्षाचे प्रतिनिधी पाठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या नितीश कुमार यांनी ही बैठक रद्द करून टाकली.

त्याचे कारण देताना देखील त्यांनी ज्या बैठकीत पक्षांचे प्रमुख नेते नाहीत, त्या बैठकीला काही अर्थ नाही, असे स्पष्ट सांगितले. आम्ही काँग्रेसला देखील कळवले आहे की त्यांनी त्यांनी हे निश्चित करावे ही बैठकीला कोण येईल? केवळ प्रतिनिधी पाठवून चालणार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी प्रमुख नेते उपस्थित राहतील ती निश्चित तारीख आणि वेळ ठरवली की नंतरच बैठक होईल, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

The meeting called by Nitish Kumar on June 12 in Patna was cancelled

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात