पाटण्यात होणारी विरोधकांची बैठक तूर्त स्थगित, लोकसभा निवडणुकीवर होणार होती चर्चा


नितीश कुमारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काही दिवसांनी बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या महिन्याच्या १२ तारखेला होणारी विरोधी पक्षांची बैठक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि द्रमुकच्या विनंतीवरून ही बैठक काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीत २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार होती. The opposition meeting in Patna has been postponed for the time being

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधी ऐक्यासाठी संवादक म्हणून काम करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या काही दिवसांनी बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

नितीश कुमार सर्व समविचारी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा विचार करत आहेत आणि त्यासाठी ते ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांना पटवण्यात यशस्वी झाले आहेत.

The opposition meeting in Patna has been postponed for the time being

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात