ओडिशा रेल्वे अपघातात घातपाताची दाट शक्यता; सीबीआय तपासाची थेट रेल्वेमंत्र्यांची शिफारस


वृत्तसंस्था

भूवनेश्वर : ओडिशातील बालासोर नजीक झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मानवी आणि तांत्रिक चुका झाल्या असल्या तरी त्याची व्याप्ती लक्षात घेऊन घातपाताची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच या सर्व अपघात प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय तर्फे चौकशी करण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केल्यानंतर त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुजोरा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील सीबीआय तपासाची पुष्टी केली असून लवकरच या संदर्भात केंद्र सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. Railways minister has recommended a CBI probe into Balasore train accident

बालासोर नजीक झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेस अपघातात अधिकृतरित्या मृतांची संख्या 275 आहे, तर 1100 जण जखमी आहेत. रेल्वे सेवा बहाल करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पण दरम्यानच्या काळात हा अपघात काही मानवी तांत्रिक चुकांमुळे झाल्याचे सकृत दर्शनी दिसले आहे. पण त्या पलीकडे अनेक इंजिनियर्स आणि तज्ञांनी त्यामागे घातपाताची गंभीर शक्यता ही व्यक्त केली आहे. त्यामुळे सीबीआय तपासाची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे आणि त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुजोरा दिला आहे.

रेल्वेचे माजी जनरल मॅनेजर आणि वंदे भारत एक्सप्रेस शिल्पकार सुधांश मणी यांनी देखील सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यामागे घातपात याची शक्यता वर्तवली आहे. रेल्वे सिग्नलच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये घोळ करून ठेवल्याने अपघात झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ ही सर्व सिस्टीम विशिष्ट पद्धतीने हाताळण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच यामागे घातपाताची शक्यता वाटते, असे स्पष्ट मत सुधांशू म्हणी यांनी व्यक्त केले आहे.

Railways minister has recommended a CBI probe into Balasore train accident

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात