The Kashmir Files : “विशिष्ट” थेटरात खुर्च्या रिकाम्या तरी “हाऊस फुल्ल”चे बोर्ड; सिनेमा उतरवायचे मनसूबे; मोठे षडयंत्र की…??


प्रतिनिधी

मुंबई : सध्या देशात आणि परदेशात गाजल असलेल्या “द काश्मीर फाइल्स” या सिनेमावरून एक वेगळा वाद तयार होताना दिसतो आहे. काही ठिकाणी थिएटरमधल्या खुर्च्या रिकाम्या आहेत, पण बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले आहेत आणि काही ठिकाणी “द काश्मीर फाईल्स” सिनेमाची पोस्टर्स देखील लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा काही थिएटर मालकांचा प्रयत्न यातून दिसून येत आहे. The Kashmir Files theatre empty

“विशिष्ट” भागात “विशिष्ट” थिएटर मालक हा प्रकार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या विषय सोशल मीडिया मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी थिएटर मालकांना घेरून जाब विचारल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे…??

“द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा काश्मीर मधील हिंदूंचे शिरकाण दाखवतो म्हणून “काही विशिष्ट लोकांना” तो “पचत” नाही का…??, असा सवाल सोशल मीडियातून करण्यात येत आहे. त्याच वेळी “विशिष्ट” थिएटर मालक “विशिष्ट” थिएटर मधून हा सिनेमा बंद करण्याचा मनसुबा आखत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षक या सिनेमाकडे वळले असले तरी थिएटर मालकांच्या “विशिष्ट” मनोवृत्तीतून या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवावी असेच मनसूबे आखले जात असल्याचे दिसून येत आहे.

– काश्मीर मधील हिंदू शिरकाणावर भाष्य

काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जर थिएटरमध्ये लावू दिला नाही, तर योग्य तो धडा शिकला जाईल, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी थिएटर मालकांना दिला आहे, सोबतच हे ठाकरे – पवार सरकारच्या दबावामुळे घडत असल्याचे म्हणत, सरकारवर निशाणा साधला आहे.

– सिनेमाचा बिझनेस चांगला पण…

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतो आहे, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दाबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला, तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा, अशा आशयाचे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

– करमुक्त करण्याची मागणी

काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले. याचे योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे मुख्यमंत्री हा चित्रपट अनेक लोकांनी पहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे, असे पत्र  लिहित आमदार अतुल भातखळकरांनी हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी सरकारकडे केली.

The Kashmir Files theatre empty

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात