अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन खून; 30 वर्षीय आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला; तेलंगणच्या डीजीपींचे ट्विट


वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर आढळून आल्याचे ट्विट तेलंगणच्या डीजीपीनी केले आहे. संबंधित आरोपीला पकडून एन्काऊंटर करू, असे तेलंगणचे मंत्री चमकूला मल्ला एचडी रेड्डी यांनी म्हटले होते. Telangana | Accused in case of rape & murder of a 6-year-old girl, was found dead on the railway track in the Ghanpur area

आम्ही सरकार म्हणून बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे आहोत. त्यांना आम्ही मदत करू. पण लवकरात लवकर या कुणासोबत गुन्ह्यातील आरोपीला पकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल, असे चमकुला रेड्डी यांनी सांगितले होते.



हैदराबाद पोलिसांनी तीस वर्षे आरोपी राजू याला पकडण्यासाठी दहा लाख रुपयांचे इनाम लावले होते. असून विविध ठिकाणी पोलिसांच्या टीम त्याला अटक करण्यासाठी रवाना झाल्या होत्या. पण आता त्याचा मृतदेह लागवड घनपूर येथील रेल्वे ट्रॅक वर आढळला आहे. आरोपीच्या शरीरावरील खुणांशी या मृतदेहाच्या खुणा जुळत आहेत, असे तेलंगणच्या डीजीपीनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तेलंगणमध्ये या बलात्कार प्रकरणामुळे प्रचंड संतापाची भावना असल्याने हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाईसाठी पथके तयार केली होती. तसेच या संतापातून चमकुला रेड्डी यांनी आरोपीच्या एन्काउण्टरचे विधान केले होते.

Telangana | Accused in case of rape & murder of a 6-year-old girl, was found dead on the railway track in the Ghanpur area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात