वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तेलापेक्षाही साखर आरोग्यासाठी जास्त घातक आहे. साखर हे निकोटीन आणि कॅफीन सारखीच व्यसन आहे.sugar is more dangerous than oily food
अमेरिकन डॉक्टर आणि डॉ. एरिक बर्ग गेल्या ३० वर्षांपासून केटो फूडवर संशोधन करत आहेत आणि त्याचा प्रचार करत आहेत. त्यांनी साखर निकोटीन आणि कॅफीन सारखीच व्यसन लावणारी असल्याचं म्हटलंय. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
सकस आहारात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण किती असावं यावर मत वेगवेगळं असू शकतं. अनेकजण तेल, तूप, लोणी इत्यादी कोणत्याही प्रकारचे स्निग्ध पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत, असेही सांगतील. मात्र, कर्बोदकं, साखर यांचा कोणी फारसा विचार करत नाही.
शरीरातील चरबी वाढल्यामुळं हृदयविकाराचा झटका आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो. अनेक दशकांपासून वैद्यकीय संघटना, अन्न नियंत्रण अधिकारी स्निग्ध पदार्थ आरोग्यसाठी चांगले नसल्याचं सांगत आहेत. मात्र, याविषयी जगभरातील वैद्यकीय शास्त्राचं मत आता बदलत आहे.
आज बरेच डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय आहारात चरबी समाविष्ट करण्याबद्दल आणि कार्बोहायड्रेट्स वगळण्याबद्दल बोलतात. तसंच आता वैद्यकीय शास्त्र हे मानू लागलंय की, साखर ही आरोग्यासाठी सर्वात घातक असल्याचे सांगत आहेत.
साखर आपण आपल्या जीवनाचा एक भाग बनवली आहे, ती खरोखर धोकादायक आहे. त्यामुळं जीवनातून आजपासून कार्बोहायड्रेट आणि साखर या दोन्हींचा निरोप घेण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App