Shocking Serum CEO Adar Poonawala Says I will beheaded if i tell the truth, threatened by big political leaders

धक्कादायक : ‘खरं बोललो, तर शीर कापतील’; सीरम प्रमुख अदर पुनावालांना बड्या नेत्यांकडून धमक्या; कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे बोट?

Serum CEO Adar Poonawala : देशात कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत रौद्ररूप धारण केले आहे. एकीकडे रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत असताना दुसरीकडे लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु आता लसींचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून भारतातील प्रमुख लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट परदेशातही लसीचे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला इंग्लंडमध्ये गेलेले आहेत. तेथे त्यांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीने मात्र खळबळ उडवली आहे. मुलाखतीत पुनावाला यांनी त्यांना धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, मी जर खरे बोललो, तर माझे शीर कापले जाईल, अशी भीतीही त्यांना वाटते. त्यांनी मुलाखतीत कुणाचेही नाव घेतलेले नसले तरी अशी धमकी देणारा मुख्यमंत्री कोण? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. Shocking Serum CEO Adar Poonawala Says I will beheaded if i tell the truth, threatened by big political leaders


विशेष प्रतिनिधी

लंडन : देशात कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत रौद्ररूप धारण केले आहे. एकीकडे रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत असताना दुसरीकडे लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु आता लसींचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून भारतातील प्रमुख लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट परदेशातही लसीचे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला इंग्लंडमध्ये गेलेले आहेत. तेथे त्यांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीने मात्र खळबळ उडवली आहे. मुलाखतीत पुनावाला यांनी त्यांना धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, मी जर खरे बोललो, तर माझे शीर कापले जाईल, अशी भीतीही त्यांना वाटते. त्यांनी मुलाखतीत कुणाचेही नाव घेतलेले नसले तरी अशी धमकी देणारा मुख्यमंत्री कोण? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

अदर पुनावाला म्हणाले की, त्यांना देशातील श्रीमंत आणि बड्या राजकारण्यांकडून धमक्या मिळताहेत. यामुळेच कोरोना लसीचे उत्पादन त्यांना लंडनमध्ये करायचे आहे, अशी चर्चा सुरू आहे. लंडनमधील ‘द टाइम्स’ने याबाबत सविस्तर बातमी दिली आहे. यानुसार, अदर पुनावाला यांनी त्यांना येणाऱ्या फोन कॉल्सबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सातत्याने येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक असल्याचं ते म्हणाले.

मुलाखतीमध्ये पुनावाला म्हणाले की, हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांकडून येत आहेत. भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, व्यावसायिक प्रमुखांनी आणि इतर अनेकांनी कोव्हिशील्ड लसीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्यांचा अतिरेक आहे. फोन कॉलमधील अपेक्षा आणि दुराग्रह चिंताजनक आहे.

एका दिवसापूर्वीच सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले होते. सीआरपीएफद्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे. अवघे जग कोरोनाने ग्रस्त असताना त्यावर प्रभावी असणाऱ्या लसीच्या उत्पादकाचा जीव धोक्यात आल्यानं त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. आता पुनावाला यांच्या मुलाखतीनुसार त्यांना धमकी देणारा तो मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Shocking Serum CEO Adar Poonawala Says I will beheaded if i tell the truth, threatened by big political leaders

महत्त्वाच्या बातम्या