महाराष्ट्रात लसीकरणासाठी गेलेल्या 18+ वयोगटाची निराशा, अजित पवार म्हणाले – 45 वर्षांपुढील लोकांसाठीही लसीचा साठा नाही

Vaccine Shortage In Maharashtra, Ajit Pawar Says We Also Not Have Enough Doses For people above Age 45

Vaccine Shortage In Maharashtra : देशात आजपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजपासून आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची योजना केली होती, परंतु आमच्याकडून केवळ तीन लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 20 हजार डोस पुणे जिल्ह्याला देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, आज आमच्याकडे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठीही लसीचा साठा नाही. Vaccine Shortage In Maharashtra, Ajit Pawar Says We Also Not Have Enough Doses For people above Age 45


वृत्तसंस्था

मुंबई : देशात आजपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजपासून आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची योजना केली होती, परंतु आमच्याकडून केवळ तीन लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 20 हजार डोस पुणे जिल्ह्याला देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, आज आमच्याकडे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठीही लसीचा साठा नाही.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “आम्ही आजसाठी मोठी योजना आखली होती, पण आम्हाला फक्त 3 लाख डोस मिळाले. त्यापैकी 20,000 पुणे जिल्ह्यात देण्यात आले आहेत. आमच्याकडे लसीचा साठा नसल्याने आम्ही 18 वर्षांहून अधिक लोकांना लस देऊ शकत नाहीयेत.”

दरम्यान, लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा आजपासून देशात सुरू झाला आहे. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस देण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तेथे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

अजित पवार म्हणाले, “आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता की 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना 1 मेपासून लस देण्यास सुरुवात करू. महाराष्ट्रात या वयोगटातील 5.71 कोटी लोक आहेत आणि आम्हाला सुमारे 12 कोटी लोकांचे लसीकरण करायचे आहे. 6.5 कोटी लसीचे डोस खरेदी करायचे होते. आम्ही याच्या खरेदीला मंजुरीही दिली होती. राज्याचे अर्थ मंत्रालय एकाच वेळी याचे सर्व पैसे द्यायला तयार आहे.

ते म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देणे त्यांना अवघड आहे. ते म्हणाले की, लसीचे पुरेसे डोस खरेदी करण्यासाठी सरकारने भारत बायोटेकला ऑर्डर नोंदवली आहे.

ते म्हणाले, “आदर पुनावाला यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, लसींचा मोठा साठा देणे शक्य नाही. आम्ही भारत बायोटेककडेही बुकिंगही केली आहे. लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे.” पवार म्हणाले की, इतर देशांकडून लस मिळवण्यासाठी आम्ही केंद्राकडून परवानगी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रशियाच्या लसीचे डोस आज मिळतील. परंतु याची किंमत अद्यापही स्पष्ट नाही.”

रुग्णालयांमधील आगीच्या घटनांबाबत राज्य सरकारने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, “रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. बहुतेक सरकारी रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण झाले, काही शिल्लक राहिले आणि लवकरच त्यांना कव्हर केले जाईल. चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांसाठी निरीक्षणाचे आदेश दिलेले असून ते लवकरच सुरू होईल.”

Vaccine Shortage In Maharashtra, Ajit Pawar Says We Also Not Have Enough Doses For people above Age 45

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात