Corona Crisis : देश भयंकराच्या दारात, पहिल्यांदाच 24 तासांत 4 लाखांहून जास्त रुग्णांची नोंद, तर 3523 मृत्यूंची नोंद

Corona Crisis In India, more than 4 lakh cases in Just 24 Hours, Active cases Crosses 32 Lakh

Corona Crisis : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार उडवला आहे. आणखी किती दिवस महामारी सुरू राहील, हे आताच सांगणे शक्य नाही. भारत हा जगातील पहिला देश ठरलाय जेथे एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशात सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण संक्रमितांचा आकडा वाढून 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 झाला आहे. याबरोबरच देशातील सक्रिय रुग्णसंख्येने 32 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. Corona Crisis In India, more than 4 lakh cases in Just 24 Hours, Active cases Crosses 32 Lakh


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार उडवला आहे. आणखी किती दिवस महामारी सुरू राहील, हे आताच सांगणे शक्य नाही. भारत हा जगातील पहिला देश ठरलाय जेथे एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशात सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण संक्रमितांचा आकडा वाढून 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 झाला आहे. याबरोबरच देशातील सक्रिय रुग्णसंख्येने 32 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 3522 लोकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 2,11,836 झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ते आता वाढून 32,63,966 वर पोहोचले आहेत, जे एकूण संसर्गाच्या 16.90 टक्के आहे. लोकांचा बरे होण्याचा दर 81.99 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. देशात आतापर्यंत 1,56,73,003 लोक बरे झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के आहे.

देशातील कोरोनाची सद्य:स्थिती

मागच्या 24 तासांत आढळलेले रुग्ण : 4,02,110
मागच्या 24 तासांतील मृत्यू : 3522
मागच्या 24 तासांत बरे झालेले : 2,99,988
एकूण रुग्णसंख्या : 1,91,64,969
एकूण बरे झालेले रुग्ण : 1,56,84,406
एकूण मृत्यू : 2,11,853
सक्रिय रुग्णसंख्या : 32,68,710
आतापर्यंत झालेले लसीकरण : 15,49,89,635

आतापर्यंत एकूण 2,11,835 मृत्यू

गेल्या 24 तासांत 3521 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 828, दिल्लीत 375, उत्तर प्रदेशात 33२, कर्नाटकमध्ये 217, छत्तीसगडमध्ये 269, गुजरातमध्ये 173, राजस्थानमध्ये 155, झारखंडमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि तामिळनाडूमध्ये 113 जणांचा मृत्यू. देशात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 2,11,835 जण मरण पावले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 68,813, दिल्लीत 16,148, कर्नाटकात 15,523, तामिळनाडूमध्ये 14,046, उत्तर प्रदेशात 12,570, पश्चिम बंगालमध्ये 11,344, छत्तीसगडमध्ये 9022 आणि पंजाबमध्ये 8581 जणांचा मृत्यू झाला आहे.

10 राज्यांत 73.05 टक्के रुग्ण

देशात एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णसंख्येपैकी 73.05 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 10 राज्यांतील आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

Corona Crisis In India, more than 4 lakh cases in Just 24 Hours, Active cases Crosses 32 Lakh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात