गुजरातमधील कोव्हिड सेंटरला आग; १८ जणांचा होरपळून मृत्यू


वृत्तसंस्था

भरुच (गुजरात) : गुजरातमधील कोव्हिड सेंटरला भीषण आग लागून 16 रुग्णांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशा घटना घडल्या होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास कोव्हिड सेंटरला ही आग लागल्याचं समोर आलं आहे. Fire at Covid Center in Gujarat; 18 killed



भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आलं होतं. तिथेच रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आलं. परंतु आग एवढी भीषण होती की त्यात 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

अग्निशमन विभागाने बरीच मेहनत घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 58 जणांवर उपचार सुरू होते. आयसीयू वॉर्डात 27 रूग्ण होते. या घटनेत 18 जण ठार झाले असून ज्यात 16 रुग्ण आणि 2 कर्मचारी होते. मात्र मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील रूग्णांना सिव्हिल हॉस्पिटल, सेवाश्रम हॉस्पिटल, जंबूसर अल महमूद यांच्यासह भरुचमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख

दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शोक व्यक्त केला असून मृत डॉक्टर, रुग्ण यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Fire at Covid Center in Gujarat; 18 killed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात