Delhi Lieutenant Governor Anil Baijal tests positive for COVID19, isolated himself

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण, होम आयोसेलेशनमधून पाहणार दिल्लीचा कारभार

Delhi Lieutenant Governor Anil Baijal : कोरोनामुळे दिल्लीत हाहाकार उडालेला आहे. आता उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यावर उपराज्यपालांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. उपराज्यपाल यांनी स्वत:हून ट्विट करून ही माहिती दिली आहे. Delhi Lieutenant Governor Anil Baijal tests positive for COVID19, isolated himself


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे दिल्लीत हाहाकार उडालेला आहे. आता उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यावर उपराज्यपालांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. उपराज्यपाल यांनी स्वत:हून ट्विट करून ही माहिती दिली आहे.

बैजल यांनी ट्वीट केले की, “सौम्य लक्षणांसह आज माझी कोविड टेस्ट सकारात्मक आली आहे. लक्षणे सुरू झाल्यापासून मी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. यादरम्यान मी माझ्या घरातून काम करत असताना दिल्लीत होत असलेल्या कामांची निगराणी करणार आहे.”

दरम्यान, उपराज्यपाल बैजल दिल्लीमध्ये कोविड-19 विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी मुख्य सचिव विजय देव यांच्याकडे त्यांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरणासाठी दिल्लीतील तयारीविषयी अहवाल मागविला. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (सुधारणा) कायदा २०२१ अस्तित्वात आल्यानंतर हे त्यांचे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कायद्यानुसार दिल्लीतील ‘सरकार’ म्हणजे उपराज्यपाल आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या कायद्यातील तरतुदी 27 एप्रिलपासून लागू आहेत.

Delhi Lieutenant Governor Anil Baijal tests positive for COVID19, isolated himself

महत्त्वाच्या बातम्या