Central Govt procures 258.74 lakh tonnes wheat at MSP for Rs 51,100 cr

केंद्र सरकारकडून २५८.७४ लाख मेट्रिक गव्हाची एमएसपीवर ५१ हजार कोटी रुपयांत खरेदी

MSP : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदिगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात तसेच जम्मू आणि काश्मिरातून रब्बी हंगामात आर्थिक वर्ष 2021-22 अंतर्गत केंद्र सरकारकडून एमएसपीवर गव्हाची खरेदी सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण 258.74 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे. यामुळे 25,08,619 शेतकऱ्यांना 51,100.83 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्याचा लाभ झाला. Central Govt procures 258.74 lakh tonnes wheat at MSP for Rs 51,100 cr


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदिगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात तसेच जम्मू आणि काश्मिरातून रब्बी हंगामात आर्थिक वर्ष 2021-22 अंतर्गत केंद्र सरकारकडून एमएसपीवर गव्हाची खरेदी सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण 258.74 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे. यामुळे 25,08,619 शेतकऱ्यांना 51,100.83 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्याचा लाभ झाला.

चालू खरीप सत्रात 2020-21 साठी राज्यांची धान खरेदी योग्य पद्धतीने सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत 715.35 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झालेली आहे. तर गतवर्षी 651.40 एलएमटी धानाची खरेदी झाली होती. सध्याच्या केएमपी खरेदी अभियानांतर्गत 1,35,057.43 कोटी रुपये एमएसपी मूल्यासोबत 107.55 लाख शेतकरी आधीपासूनच लाभान्वित झाले आहेत.

याशिवाय, राज्यांच्या प्रस्तावाच्या आधारावर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, ओडिशा, राजस्‍थान आणि आंध्र प्रदेश राज्यांसाठी खरीप 2020-21 आणि रबी आर्थिक सत्र 2021 मध्ये मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत 107.08 एलएमटी डाळी तसेच तेलबियांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांसाठी 1.23 एलएमटी कोपरा (बारमाही पीक) खरेदीसाठीही मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांतूनही पीएसएस अंतर्गत डाळी, तेलबिया आणि कोपरा खरेदीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल.

सरकारने आपल्या नोडल एजन्सींच्या माध्यमातून 28 एप्रिलपर्यंत 6,09,210.53 मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, चणा, मसूर, भुईमूग, मोहरी आणि सोयाबीनची खरेदी केली आहे. खरीप 2020-21 आणि रबी सत्र 2021 दरम्यान आतापर्यंत 3,195.80 कोटी रुपये एमएसपी मूल्याची खरेदी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण, हरियाणा आणि राजस्थानचे 3,97,097 शेतकरी लाभान्वित झाले.

याचप्रकारे 52.40 कोटी रुपये एमएसपी मूल्याच्या 5,089 मेट्रिक टन कोपराची खरेदी करण्यात आली ज्यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडूचे 3,961 शेतकरी लाभान्वित झाले. संबंधित राज्य/ केंद्र शासित प्रदेशातील सरकारे डाळी आणि तेलबियांच्या आवकीच्या आधारे संबंधित राज्यांद्वारे निर्धारित तारखेपासून खरेदी सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करत आहेत.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक सारख्या राज्यांत एमएसपीअंतर्गत सीड कॉटन (सरकी) खरेदीची सुरळीत सुरू आहे. याअंतर्गत आतपर्यंत 26,719.51 कोटी रुपयांद्वारे 91,89,310 कापूस गाठींची खरेदी करण्यात आली. यामुळे 18,86,498 शेतकरी लाभान्वित झाले.

Central Govt procures 258.74 lakh tonnes wheat at MSP for Rs 51,100 cr

महत्त्वाच्या बातम्या