कोरोना संकटात केंद्र सरकारकडून मोठी मदत, 8873 कोटींचा पहिला हप्ता राज्यांना जाहीर

Central government opens treasury amid Corona crisis, SDRF first installment of 8873 crores released to states

SDRF : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी (एसडीआरएफ) केंद्राच्ा हिश्शातील 8873.6 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. मंत्रालयाने म्हटले की, जाहीर केलेल्या रकमेच्या 50 टक्के म्हणजेच 4436.8 कोटी रुपये राज्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरू शकतात. Central government opens treasury amid Corona crisis, SDRF first installment of 8873 crores released to states


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी (एसडीआरएफ) केंद्राच्ा हिश्शातील 8873.6 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. मंत्रालयाने म्हटले की, जाहीर केलेल्या रकमेच्या 50 टक्के म्हणजेच 4436.8 कोटी रुपये राज्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरू शकतात.

गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार 8873.6 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे एसडीआरएफचा पहिला हप्ता वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जून महिन्यात जारी केला जातो.

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना देण्यात आलेल्या रकमेच्या वापराच्या दाखल्याची प्रतीक्षा न करता सामान्य प्रक्रिया शिथिल करून एसडीआरएफसाठी रक्कम जाहीर झाली आहे.”

एसडीआरएफमध्ये प्राप्त झालेला निधी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, एअर प्युरिफायर्स, रुग्णवाहिका सेवा बळकट करणे, कोरोना रुग्णालये, ऑक्सिजन उत्पादन आणि स्टोअरेज प्लांटची किंमत पूर्ण करण्यासह कोरोनाशी संबंधित विविध उपाययोजनांसाठी राज्ये याचा वापर करू शकतात.

Central government opens treasury amid Corona crisis, SDRF first installment of 8873 crores released to states

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात