महाराष्ट्र दिन चिरायु होवो! राकट देशा, कणखर देशा ! तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल…

महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस : १ मे १९६० ते १ मे २०२१ प्रवास सामाजिक न्यायाचा .. विकासाच्या वाटेचा .. कलांच्या जतनांचा .. अभिनंदन .. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या लाखो लढवय्यांना सलाम .. बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन .. जय महाराष्ट्र जय भारत !


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात साजरा करता येणारा दिवस म्हणजे १ मे. यंदा राज्याच्या स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. यानिमित्ताने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. Maharashtra Day 2021

महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील ‘महा’ म्हणजेच महान आणि ‘राष्ट्र’ म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.या महान राष्ट्राने कणखर व्हावे आणि कोरोनासारख्या भयंकर संकटातून लवकरात लवकर मुक्त व्हावे।

महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले.

मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरून प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीतील नेत्यांचा डाव हाणून पाडत मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली.

कोरोनाच्या काळोख्या वातावरणात महाराष्ट्राची एकसष्टी साजरी होत आहे.

अगदी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, सांस्कृतिक जगत, ज्ञानविज्ञानाचे, विज्ञान तंत्रज्ञानाचे जगत, उद्योग-व्यवसाय या सर्वांमध्ये हा महाराष्ट्र 61 वर्षे आघाडीवर आहे आणि त्या अर्थानेच तो या भारताचा आधार राहिला आहे.

महाराष्ट्र निर्मितीत  सुमारे १०५ मराठी बांधव हुतात्मे झाले. अशा या खास दिवशी हुतात्मांना अभिवादन करून या संयुक्त महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा!

यंदा मोठ्या उत्साहात सार्वजनिक पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करता येणार नाही.  गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. याच दिवशी जागतिक कामगार दिनसुद्धा असतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. तसेच, कोरोनाच्या संकटावर देखील आपण मात करू, असा विश्वास त्यांनी जनतेशी संवाद साधताना व्यक्त केला.

महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल….

Maharashtra Day 2021

महत्त्वाच्या बातम्या