कोरोना उद्रेकामुळे TDS, उशिराने टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढली, आता या तारखेपर्यंत करा फाइल, वाचा सविस्तर…

CBDT Extends Income tax compliance deadline, amid covid surge, Read Details here

CBDT Extends Income tax compliance deadline : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) शनिवार एक मोठा निर्णय घेत टीडीएस जमा करण्याचा आणि उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. CBDT ने हा निर्णय वाढलेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. CBDT Extends Income tax compliance deadline, amid covid surge, Read Details here


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) शनिवार एक मोठा निर्णय घेत टीडीएस जमा करण्याचा आणि उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. CBDT ने हा निर्णय वाढलेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. CBDT कडून जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार, प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्याची, आयुक्तांकडे अपील करण्याची आणि विवाद समाधान पॅनलच्या आदेशांवर आक्षेप नोंदवण्यास अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.

निवेदनानुसार, करदाता 1 एप्रिल किंवा त्यानंतर टीडीएसला मेच्या अखेरपर्यंत कायद्यातील उल्लेखित तारखांच्या आत किंवा जारी केलेल्या नोटिशीत जेही नंतर येते, तोपर्यंत जमा करू शकतात. याशिवाय मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा आणि संशोधित रिटर्न, जे 31 मार्च 2021 ला किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते, त्यासाठी आता 31 मे 2021 पर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.

31 मेपर्यंत मुदतवाढ

प्राप्तिकर अधिनियम मूल्यांकनकर्त्यांना मूळ रिटर्नमध्ये काही चूक किंवा चुकीचा तपशील शोधला तर मूल्यांकन वर्षाच्या अखेरपर्यंत कर निर्धारण पूर्ण करण्याआधी संशोधित रिटर्न दाखल करण्याची अनुमती देतो. संपत्ती खरेदी-विक्रीत पैसे देणाऱ्या व्यक्तींकडून टीडीएस जमा करण्यासाठी नियत तारीख आता 30 एप्रिल ऐवजी वाढवून मई अखेरपर्यंत करण्यात आली आहे.

संपत्तीच्या खरेदी विक्रीत 1 टक्के आणि 50,000 रुपयांहून अधिक किरायाच्या देयकात 5 टक्के टीडीएस जमा करावा लागतो. सीबीडीटीने म्हटले की, त्यांना करदात्यांना, सल्लागारांना आणि इतर हितधारकांकडून नियत तारखांमध्ये सूट मिळण्यासाठी अनेक विनंत्या आल्या आहेत, यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

CBDT Extends Income tax compliance deadline, amid covid surge, Read Details here

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात