Gas Cylinder Price : व्यावसायिक गॅस ४५ रूपयांनी स्वस्त ; घरगुती गॅस मात्र महागच

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कमी झालेल्या व्यावसायिक मागणीमुळे सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४५ रुपयांची कपात केली आहे .Gas Cylinder Price : Commercial gas cheaper by Rs 45; However, domestic gas is expensive

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली त्यानुसार  १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत ४५.५० रुपयांनी कपात झाली आहे. मात्र, घरगुती गॅस ग्राहकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांनी कपात झाली होती. यानंतर महाराष्ट्रात सध्या १४ किलो गॅसच्या सिलिंडरची किंमत ८१४ रुपये आहे.

स्वयंपाक घरातील गॅसवर जीएसटी ५ टक्के आणि एलपीजीवर १८ टक्के दराने आकारला जातो, त्यातील २.५ टक्के केंद्रीय खात्यात आणि २.५ टक्के राज्य खात्यात जातात . म्हणजेच प्रति सिलेंडर १९.२० रुपये केंद्रीय आणि राज्य खात्यात जातात. व्यावसायिक गॅसवर जीएसटी आकारला जातो, त्यापैकी ९ टक्के केंद्रीय खात्यात आणि ९ टक्के राज्य खात्यावर जातात. म्हणजेच, प्रति सिलेंडर १२४.७० रुपये केंद्रीय आणि राज्य खात्यात जातात.

इंडेन ऑईलने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोच्या गॅस सिलेंडरची नवी किंमत १६४१ रुपयांऐवजी आता १५९५.५० रुपये आहे. मुंबईत १५९०.५० रुपये या जुन्या किंमतीऐवजी सिलिंडर आता १५४५ रुपयांना मिळेल.

Gas Cylinder Price : Commercial gas cheaper by Rs 45; However, domestic gas is expensive