Amid corona crisis Rs 1 lakh 41 crore bumper GST Collection in April in India

GST Collection : एप्रिलमध्ये 1.41 लाख कोटी रुपयांचे बंपर कलेक्शन, कोरोना संकटात देशाला आधार

GST Collection : देशातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या दरम्यान सरकारसाठी दिलासादायक वृत्त आहे. एप्रिल महिन्यातील देशाचे जीएसटी कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी कलेक्शन 1,41,384 कोटी रुपये राहिले, हा एक नवा रेकॉर्ड आहे. यात सेंट्रल जीएसटी 27,837 कोटी, स्टेट जीएसटी 35,621 कोटी आणि इंटर जीएसटी 68,481 कोटी तसेच सेस 9,445 कोटी राहिले. IGST मध्ये 29,599 कोटी रुपये केवळ आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर टॅक्स लावून मिळाले आहेत. Amid corona crisis Rs 1 lakh 41 crore bumper GST Collection in April in India


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या दरम्यान सरकारसाठी दिलासादायक वृत्त आहे. एप्रिल महिन्यातील देशाचे जीएसटी कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी कलेक्शन 1,41,384 कोटी रुपये राहिले, हा एक नवा रेकॉर्ड आहे. यात सेंट्रल जीएसटी 27,837 कोटी, स्टेट जीएसटी 35,621 कोटी आणि इंटर जीएसटी 68,481 कोटी तसेच सेस 9,445 कोटी राहिले. IGST मध्ये 29,599 कोटी रुपये केवळ आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर टॅक्स लावून मिळाले आहेत.

मार्चचे जीएसटी कलेक्शन 123902 कोटी रुपये होते, जो आतार्यंत कोणत्याही एका महिन्यातील सर्वात जास्त होते. एप्रिलमध्ये जीएसटी कलेक्शन जुन्या संख्येच्याही खूप पुढे निघून गेले आहे. गत सहा महिन्यांतील GST कलेक्शनवर नजर टाकल्यास मार्चमध्ये हे 123902 कोटी, फेब्रुवारीत 113143 कोटी, जानेवारीत 119875 कोटी, डिसेंबरमध्ये 115174 कोटी, नोव्हेंबरमध्ये 104963 कोटी, ऑक्टोबरमध्ये 105155 कोटी राहिले होते.

मागच्या सहा महिन्यांतील जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ दिसून येत आहे. एप्रिलचे कलेक्शन मार्चच्या तुलनेत 14% जास्त आहे. दुसरीकडे देशांतर्गत व्यवहारांमुळे या महिन्यात मिळालेले उत्पन्न गत महिन्यापेक्षा 21% जास्त आहे.

Amid corona crisis Rs 1 lakh 41 crore bumper GST Collection in April in India

महत्त्वाच्या बातम्या