उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला


वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळ दुभंगल्याचे लक्षात येताच त्या महिलेने रुळावर लाल रंगाची साडी एका काठीवर लटकवून ठेवून पुढे धोका असल्याची जाणीव करून दिली. चालकाने वेळीच रेल्वे थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. senior woman prevented a major train accident in Uttar Pradesh

एटा जिल्ह्यातील अवगड ब्लॉकमधील गुलेरिया गावातील ६५ वर्षीय ओमवती शेतात जात असताना त्यांना रेल्वे ट्रॅक दुभंगल्याचे दिसल. तिने तिची लाल साडी काढून रेल्वे रुळावर एका झाडाचा फांदीवर लटकवली. एटाहून टुंडलाला जाणारी पॅसेंजर ट्रेन काही वेळातच आली. पण ड्रायव्हरला लाल साडी दिसली आणि त्याने वेळीच ब्रेक लावला. ट्रॅक खराब झाल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिली, त्यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक दुरुस्त केला. तासाभरानंतर ट्रेनचा प्रवास सुरू ठेवता आला.



रेल्वेच्या चालकाने ओमवतीच्या प्रयत्नाचे कौतुक केले आणि तिच्या मनाची आणि धैर्याबद्दल १०० रुपये बक्षीस दिले. ओमवती म्हणाली की तिने तिची साडी काढली आणि ती रुळांवर ठेवली, कारण लाल रंग हे धोक्याचे लक्षण आहे. विशेष म्हणजे तिने पैसे स्वीकारण्यास नकार देऊनही ड्रायव्हरने तिला १०० रुपयांचे बक्षीस दिल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, पोलिस अधिकारी सचिन कौशिक यांनी महिलेच्या कार्याचे कौतुक करून पूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे.

senior woman prevented a major train accident in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात