पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनात सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेले ऐतिहासिक ‘सेंगोल’ बसवणार


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. हा दिवस खूप खास असणार आहे, कारण या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र ‘सेंगोल’चा स्वीकार करतील, जी आपल्या सभ्यतेशी संबंधित एक महत्त्वाची वस्तू आहे. Prime Minister Modi will install the historic Sengol in the new Parliament building

ब्रिटीशांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक असलेला ‘ऐतिहासिक सेंगोल’ नवीन संसद भवनात बसवण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत अमित शाह म्हणाले की, नवीन संसद भवन हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे.

या नवीन संसद भवनाच्या उभारणीत सात हजार श्रमयोगींनी योगदान दिले. या सर्व श्रमयोगींचा पंतप्रधान सन्मान करणार आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशीही नवी परंपरा सुरू होणार आहे. या दिवशी संसद भवनात सेंगोलचे स्थानही निश्चित होईल. सेंगोल या वस्तूशीही आपली सभ्यता जोडलेली आहे. सेंगोल हे इंग्रजांकडून भारतात झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानले जाते. ते चोल साम्राज्याचे आहे आणि त्यावर नंदीही बनवला गेला आहे. भारताच्या इतिहासासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

Prime Minister Modi will install the historic Sengol in the new Parliament building Amit Shah

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात