सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संसदेत पोर्ट्रेट ते सावरकर जयंतीदिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन या कार्यक्रमांवर बहिष्कार घालून देशातील विरोधकांनी आपला असहिष्णू पायंडा पुढे चालू ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोर्ट्रेट संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ज्यांच्या पुढाकाराने लागले, ते शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी आज गंभीर आजारी आहेत. पण त्यांच्याच शिवसेनेच्या ठाकरे गटाने सावरकर जयंतीदिनी संसदेच्या होणाऱ्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. शिवसेनेच्या इतिहासातील ही राजकीय विसंगती नक्कीच नोंद घेण्याजोगी आहे.savarkar portrait in parliament and inauguration of new parliament; opposition boycott is permanent phenomenon

नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंती दिनी करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणमूळ काँग्रेस यांनी विरोध दर्शविला आहे. संजय राऊत यांनी तर बहिष्काराची भाषा वापरून सावरकरांच्या हिंदुत्वाला कायमचे सोडून दिल्याचे दाखवून दिले आहे. पण त्या पलीकडे जाऊन तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार सुगता रॉय यांनी देखील बहिष्काराची भाषा वापरून सावरकर – मोदी विरोध अधिक ठळकपणे अधोरेखित केला आहे.

सोनियांचे बहिष्कारचे आवाहन

पण हा सावरकर – मोदी विरोध हा काही नवा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोर्ट्रेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीए सरकारच्या काळात सेंट्रल हॉलमध्ये लागले. त्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, पंतप्रधान वाजपेयी, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेच्या उपाध्यक्ष नजमा हेपतुल्ला, तत्कालीन केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मुख्य म्हणजे त्यावेळच्या लोकसभेचे सभापती मनोहर जोशी हे प्रमुख नेते हजर होते. सावरकरांचे पोर्ट्रेट संसदेत लागले पाहिजे, हा मनोहर जोशींचा आग्रह होता. मुंबईच्या प्रख्यात चित्रकार चंद्रकला कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकरांचे पोर्ट्रेट साकारले होते. त्याचे अनावरण ज्यावेळी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते करायचे ठरले, त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रपतींना सावरकर पोर्ट्रेटचे अनावरण करू नये असे पत्र देखील लिहिले होते पण डॉक्टर कलाम यांनी तो आग्रह मानला नाही त्यांनी सावरकरांच्या पोर्ट्रेटचे समारंभपूर्वक अनावरण केले.

पोर्ट्रेट समितीत मुखर्जी, शिवराज पाटील

काँग्रेसने तसेच त्यावेळच्या विरोधी पक्षांनी प्रामुख्याने डाव्या पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. वास्तविक सावरकरांचे पोर्ट्रेट लावण्या संदर्भातल्या समितीमध्ये तत्कालीन वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी आणि शिवराज पाटील यांचाही सहभाग होता. पण तरी देखील काँग्रेसने पोर्ट्रेट अनावरणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.

लोकशाहीचा डंका पण बहिष्काराची भाषा

येत्या 28 मे रोजी सावरकर जयंतीदिनी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर अशाच बहिष्काराची पुनरावृत्ती होत आहे. पण त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. ही यातली राजकीय विसंगती आहे. मनोहर जोशी आजही तांत्रिकदृष्ट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच आहेत. पण त्यांच्या शिवसेनेने मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे म्हणून बहिष्काराची भाषा वापरली आहे. हा बहिष्कार देखील ते पक्ष आणि ते नेते घालत आहेत, जे कायम तोंडाने मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अविष्कार स्वातंत्र्य यांचा धोषा लावून लोकशाहीचा डंका पिटत असतात!!

इंदिरा, राजीव गांधी कार्यक्रम

पण जे विरोधक पंतप्रधान मोदींच्या हस्ते संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत, त्यांनी 1975 मध्ये इंदिरा गांधींनी संसदेच्या एनेक्स इमारतीचे उद्घाटन केले, त्यावर बहिष्कार घातला नव्हता. तसेच 15 ऑगस्ट 1987 रोजी पंतप्रधान राजीव गांधींनी पार्लमेंट लायब्ररीचे उद्घाटन केले. त्यावरही बहिष्कार घातला नव्हता. त्याचबरोबर त्यावेळी विरोधात असलेल्या जनसंघ अथवा भाजपने देखील या कार्यक्रमांवर बहिष्कार घातल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही. ही बाब येथे आवर्जून नमूद करावीशी वाटते

savarkar portrait in parliament and inauguration of new parliament; opposition boycott is permanent phenomenon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात