मोदींचा मास्टर स्ट्रोक : पंडित नेहरूंनी स्वीकारलेल्या सेंगोलची नव्या संसद भवनात सावरकर जयंती दिनी स्थापना!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस सह सर्व विरोधक बहिष्कार घालत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मास्टर स्ट्रोक मारत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वीकारलेला गंगाजल अभिमंत्रित सेंगोल अर्थात राजदंड नव्या संसद भवनात सावरकर जयंतीच्या दिवशी प्रस्थापित करत आहेत. Briefing the press on a very important and historical event celebrating Azadi Ka Amrit Mahotsav

भारतीय सम्राट चोल राजांची परंपरा असलेल्या सत्ता हस्तांतराचे पवित्र प्रतीक सेंगोल अर्थात राजदंडाची नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. 20 तमिळ विद्वानांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात मोदी पवित्र सेंगोल स्वीकारतील आणि तो लोकसभा अध्यक्षांना देऊन त्यांच्यासमोर प्रस्थापित करतील.

या संदर्भातली माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तमिळ भाषेत ज्याला सेंगोल म्हणतात तो प्रत्यक्ष राजदंड आहे. ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतर होत असताना ते कोणत्या प्रतीकाने व्हावे?, याविषयी शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारणा केली होती. त्यावर विचार करून उत्तर देतो, असे सांगून पंडित नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सत्ता हस्तांतर राजव्यवहार कसा असावा?, हे ठरविण्याची जबाबदारी सोपविली होती.

राजगोपालाचारी यांनी संस्कृत, तमिळ ग्रंथांचा अभ्यास करून चोल राजवंशीयांची सत्ता हस्तांतराची सेंगोल प्रदान आणि प्रतिष्ठापना ही प्रक्रिया स्वीकारायची शिफारस केली. त्यानुसार तमिळ पंडितांनी पवित्र सेंगोलची निर्मिती करून तो सेंगोल गंगाजलाने अभिमंत्रित करून 14 ऑगस्ट 1947 रोजी सायंकाळी पंडित जवाहरलाल नेहरूंना सोपविला. सत्तांतर प्रक्रियेचा तो महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर पंडित नेहरूंनी आपले “ट्रिस्ट विथ डेस्टिनी” हे 14 ऑगस्ट 2018 1947 रोजीचे ऐतिहासिक भाषण केले होते.

या सेंगोल प्रदान – प्रतिष्ठापनेची दखल टाईम मॅगझीन सह देश विदेशातील सर्व माध्यमांनी घेतली. पण नंतरच्या काळात हा सेंगोल भारतीय इतिहासातून पुसला गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेंगोल प्रतिष्ठापनेची ऐतिहासिक परंपरा पुनर्जीवित करणार असून त्यासाठी त्यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा 28 मे 2023 रोजीचा सावरकर जयंतीचा मुहूर्त निवडला आहे.

काँग्रेस सह 19 पक्षांचे सर्व विरोधक नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणार आहेत आणि त्याच दिवशी नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारलेल्या सेंगोलची नव्या संसद भवन भावनात पुनर्स्थापना करणार आहेत. हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे.

Briefing the press on a very important and historical event celebrating Azadi Ka Amrit Mahotsav

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात