टिचभर केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हीटी रेटही निम्मा तरी उत्तर प्रदेशची कोरोना रुग्णांच्या संख्येवरून बदनामी


टिचभर असलेल्या केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हिटी रेटही कमी तरी केरळच्या कोरोना मॉडेलचा गवगवा होत असताना उत्तर प्रदेशाची बदनामी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट केवळ १२.६६ आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टिचभर असलेल्या केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हिटी रेटही कमी तरी केरळच्या कोरोना मॉडेलचा गवगवा होत असताना उत्तर प्रदेशाची बदनामी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट केवळ १२.६६ आहे.Positivity rate of UP is less than Maharashtra,Kerala and most of the states

उत्तर प्रदेशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वीपणे रोखले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध उपाययोजना केल्या. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी थेट घरापर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा उपक्रम राबविला होता.



दुसºया लाटेतही उत्तर प्रदेशातील सक्रीय रुग्णांची संख्या केवळ सव्वा दोन लाख आहे.महाराष्ट्रात हिच संख्या सहा लाखांच्या वर आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत लोकसंख्या आणि क्षेत्रपळाने अगदीच छोट्या असलेल्या केरळमध्ये तीन लाखांच्यावर रुग्ण आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वच माध्यमांतून उत्तर प्रदेशातील स्थितीची भीषण वर्णने केली जात आहेत. कोरोना बाधितांना रुग्णालये मिळत नाहीत. औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्राण जात आहेत,

अशा बातम्या दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही कोरोनाचा कहर असल्याचे म्हटले जात आहे. याठिकाणी दहा दिवस चाचणीचा अहवाल यायला लागतो. सी व्हिटॅमिनसारखी औषधेही मिळत नाहीत, असा अपप्रचार करून आमचे खासदार कोठे आहेत, असा सवाल नागरिक करत आहेत, असे विचारले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आहे. देशातील इतर राज्यांतील पॉझिटिव्हीटी रेट पुढीलप्रमाणे : गोवा – ४८.५, हरियाणा – ३६.१,पश्चिम बंगाल ३३.१, कर्नाटक २९.९, दिल्ली २९.९,

मध्य प्रदेश २७.९, पंजाब १७.५, चंदीगड २६.७, झारखंड १६.१ छत्तीसगड २७.९, झारखंड १६.१, ओडिशा २४.३, अरुणाचल प्रदेश १५.४ बिहार १८, नागालॅँड १९.७, उत्तराखंड १९.१. राजस्थान २९.९, आंध्र प्रदेश २४.४, हिमाचल प्रदेश २२.४, केरळ २१.५.तामीळनाडू १९.७.

Positivity rate of UP is less than Maharashtra,Kerala and most of the states

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात