कारवाई तरी किती जणांवर करणार, मानहानीकारक पराभावनंतरही अधीर रंजन चौधरींचा राजीनामा नाहीच


पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसचा सर्वत्र पराभवच झाला. पश्चिम बंगालमध्ये तर पक्षाची लाज पूर्ण गेली. मात्र, तरीही अधीर रंजन चौधरी यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत कॉँग्रेसने दिले आहेत. कारवाई तरी किती जणांवर करणार? हा प्रश्न असल्याने चौधरी यांना अभय मिळाले असल्याचे बोलले जात आहे.Even after the humiliating defeat, Adhi Ranjan Chaudhary has not resigned


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसचा सर्वत्र पराभवच झाला. पश्चिम बंगालमध्ये तर पक्षाची लाज पूर्ण गेली. मात्र, तरीही अधीर रंजन चौधरी यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत कॉँग्रेसने दिले आहेत.

कारवाई तरी किती जणांवर करणार? हा प्रश्न असल्याने चौधरी यांना अभय मिळाले असल्याचे बोलले जात आहे.नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत चौधरी यांनी प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते.निवडणुकीत झालेल्या अत्यंत मानहानिकारक पराभवाची जबाबदारी घेऊन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चौधरी यांनी बुधवारी दूरध्वनीवर बोलताना प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली.

गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला यंदा प्रथमच एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याला तीन टक्क्यांच्याही खाली मते मिळाली. डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना आयएसएफशी त्याची युती होती. ही युतीच कॉँग्रेसच्या हासाला कारणीभूत ठरली का?

असाही प्रश्न विचारला जात आहे. मात्र, ही युती करण्यात खासदार राहूल गांधी आणि पक्षाचे नेतृत्व जबाबदार आहे. त्यामुळेच चौधरी यांचा राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अधीर रंजन चौधरी आता म्हणत आहेत की, प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास मी नकार दिला होता; परंतु ते घेण्याचा आदेश दिला गेला तेव्हा मी माझ्याकडून जास्तीत जास्त चांगले काम केले. आता काय उरले आहे? मी जायला तयार आहे.

काँग्रेसची मते एक तर भाजपला गेली किंवा तृणमूल काँग्रेसला. कारण विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरण झाले होते आणि ममता बॅनर्जी त्यांच्या निवडणूक व्यूहरचनेत यशस्वी झाल्या हे मला मान्य आहे.

आमची व्यूहरचना अपयशी ठरली आणि पक्षाचा नेता या नात्याने त्याची जबाबदारी माझी आहे, असे चौधरी म्हणाले. मात्र कॉँग्रेसच्या नेहमीच्या शैलीत दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वावर बोट उठू नये म्हणून चौधरी यांनी सगळी जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे, असेही म्हटले जात आहे.

Even after the humiliating defeat, Adhi Ranjan Chaudhary has not resigned

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात