पश्चिम बंगालचे प्रशासनच निवडणूका तृणमूळच्या बाजूने करायला उतरते; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा आरोप

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये प्रशासनातले लोकच निवडणूका तृणमूळ काँग्रेसच्या बाजूने वळविण्यासाठी मैदानात उतरतात असा अनुभव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.In West Bengal, admn conducts polls in favour of ruling TMC party, allages congress leader adhir ranjan chaudhary

बंगालमधल्या पंचायत निवडणूकीचा अनुभव लक्षात घेतला, तर तब्बल ३४ टक्के मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोहोचूच दिले नाहीत. ते मतदान करू शकले नाहीत त्यामुळे पंचायतीच्या तब्बल २० हजार जागांवर सत्ताधारी तृणमूळ काँग्रेसचे उमेदवारच विजयी झाले. आणि आता देखील हेच बंगालमध्ये सुरू आहे.प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारीच मतदान प्रक्रियेत उतरले आहेत. त्यामुळे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडलीत, असा आरोपही अधीर रंजन चौधरी यांनी केला.

भाजपच्या उमेदवाराची सेम आरोप

असाच आरोप भाजपचे उमेदवार स्वपन दासगुप्ता यांनी केला. ते म्हणाले, की वरिष्ठ पोलीस अधिकारीच मतदान केंद्रात घुसून लोकांना बाहेर काढताहेत. महिलांना शिवीगाळ करताहेत, जेणे करून लोकांनी तिथून जावे आणि मतदान प्रक्रियेत गडबड करता यावी. यावर निवडणूक प्रतिनिधींकडे आक्षेप नोंदविल्याचेही स्वपन दासगुप्ता यांनी सांगितले.

In West Bengal, admn conducts polls in favour of ruling TMC party, allages congress leader adhir ranjan chaudhary

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*