Adhir Ranjan Chaudhary's big allegation against TMC, said- Trinamool Congress smuggled our mothers and sisters in Bengal

अधीर रंजन चौधरींचा TMCवर मोठा आरोप, म्हणाले- बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने केली आमच्या आई-बहिणींची तस्करी

तृणमूल कॉंग्रेसवर कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी जोरदार टीका केली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल कॉंग्रेसवर कोळसा आणि गाय तस्करी तसेच महिलांच्या तस्करीचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाबरोबरच नोकरशाहीवरही त्यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले की, या तस्करीच्या कारभाराला सत्ताधारी पक्षाबरोबर नोकरशाही पाठिंबा देत आहे. म्हणूनच कोणत्याही तस्करांना अटक केली जात नाही. Adhir Ranjan Chaudhary’s big allegation against TMC, said- Trinamool Congress smuggled our mothers and sisters in Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : तृणमूल कॉंग्रेसवर कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी जोरदार टीका केली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल कॉंग्रेसवर कोळसा आणि गाय तस्करी तसेच महिलांच्या तस्करीचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाबरोबरच नोकरशाहीवरही त्यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले की, या तस्करीच्या कारभाराला सत्ताधारी पक्षाबरोबर नोकरशाही पाठिंबा देत आहे. म्हणूनच कोणत्याही तस्करांना अटक केली जात नाही.

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, “कोळशाच्या तस्करीबरोबरच बंगाल गायींच्या तस्करीसाठी एक कुख्यात ठिकाण मानले जाते. आमच्या आई, मुली आणि बहिणींचीदेखील बंगालमध्ये तस्करी केली जाते. बंगालचे सत्ताधारी आणि नोकरशाही एकत्रितपणे तस्करी करत होते. त्यामुळे कोणालाही पकडले जात नाही.”उल्लेखनीय बाब म्हणजे कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नुकताच असा दावा केला होता की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डावे-कॉंग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष शक्तींची महाआघाडी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही पराभूत करेल. ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित संयुक्त रॅलीला संबोधित करताना चौधरी हे म्हणाले होते.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मोठ्या संख्येने लोकांचा जमाव हे सिद्ध करतो की आगामी निवडणूक द्विशंकू होणार नाही. ते म्हणाले की, भाजप आणि सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस यांना दोन पक्षांव्यतिरिक्त राज्यात अन्य कोणतीही राजकीय शक्ती अस्तित्वात आणण्याची इच्छा नाही. ते म्हणाले, “भविष्यकाळात भाजप किंवा तृणमूल कॉंग्रेस असणार नाही, फक्त महाआघाडी राहील.”

Adhir Ranjan Chaudhary’s big allegation against TMC, said- Trinamool Congress smuggled our mothers and sisters in Bengal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*