भारताचे progressive thinking आणि दुसऱ्या देशांचे regressive thinking; मोदींनी सांगितला आमसभेत फरक!!


वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या progressive thinking आणि दुसऱ्या देशाचे regressive thinking यातला भेद अधोरेखित केला. PM Modi says at UNGA Countries with regressive thinking that are using terrorism as a political tool need to understand that terrorism is an equally big threat for them

मोदी म्हणाले की भारत कशा पद्धतीने progressive thinking करतो पाहा, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही 75 असे उपग्रह अवकाशात सोडणार आहोत की जे शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून मानवतेसाठी कल्याणकारी भूमिका घ्यायला आम्ही शिकवतो. पण या जगात असेही regressive thinking वाले देश आहेत की जे दहशतवादाचा “पॉलिटिकल टूल” म्हणून उपयोग करतात. त्यांच्या लक्षात आले पाहिजे किंबहुना संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या हे लक्षात आणून दिले पाहिजे की हाच दहशतवाद एक दिवस त्या देशांनाही गिळंकृत करेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.

अफगाणिस्तानमध्ये महिला, अल्पसंख्यांक मुलं यांना मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी दहशतवाद वाढवण्यासाठी आणि त्याला खतपाणी घालून वाढवण्यासाठी कोणत्याही देशाने करून घेता कामा नये, हे संयुक्त राष्ट्रसंघाने त्या देशाला बजावले पाहिजे, असा गंभीर इशाराही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

PM Modi says at UNGA Countries with regressive thinking that are using terrorism as a political tool need to understand that terrorism is an equally big threat for them

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात