घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांचा राजीनामा, जी-२३ गटाच्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्याच्या मागणीला मिळणार बळ


विशेष प्रतिनिधी

भोपाल: घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाच्या लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांनी राजीनामा दिला आहे. यातून कॉँग्रेसमधील असंतुष्ठ जी-२३ गटाने पक्षश्रेष्ठींना एकप्रकारे संदेशच दिला आहे. घराणेशाहीच्या माध्यमातून एखाद्या पदावर दीर्घ काळ राहण्यास त्यांनी विरोध केला आहे. यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा दबावही वाढणार आहे.Opposing dynasticism, Congress Legal Cell National President Vivek Tankha resigns

कॉँग्रेसमधील जी-२३ हा असंतुष्ठ नेत्यांचा गट गेल्या अनेक दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आणण्यासाठी आग्रही असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी करत आहे. गांंधी कुटुंबाव्यतिरिक्त व्यक्तीलाही या पदावर संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.फेब्रुवारीमध्ये कॉँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले होते.परंतु, ऐनवेळी ही निवडणूक रद्द करण्यात आली. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि कोरोनाची दुसरी लाट हे कारण त्याला देण्यात आले. मात्र, पाच राज्यांतील निवडणुकांत कॉँग्रेसची कामगिरी अत्यंत वाईट होती. पक्षाच्या या दारुण पराभवावर चिंतन व्हावे असेही म्हटले गेले. मात्र, कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून हा आवाज दाबला गेला.

विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा राहूल आणि प्रियंका गांधी यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वावर जी-२३ गटातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, त्यांनाही गप्प बसविण्यात आले. आता विवेक तन्खा यांनी लिगल सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा देताना तन्खा म्हणाले, कोणीही व्यक्ती दीर्घ काळापर्यंत एका पदावर राहून आपल्या कामाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीकडे जबाबदारी सोपवायला हवी.तन्खा म्हणाले, मी घराणेशशहीच्या विरोधात आहे. मी स्वत: मुलगा वरुण तन्खा याच्या नरसिंहपूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यास विरोध केला होता.

त्यावेळी मी स्पष्ट सांगितले होते की वरुण माझा मुलगा आहे केवळ यामुळेच त्याला उमेदवारी देणे चुकीचे आहे. त्याने स्वत:च्या क्षमता सिध्द करून उमेदवारी मिळविली तर माझी हरकत नाही. कॉँग्रेसच्या लिग सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आपण राहू इच्छिता का असे पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विचारले होते. परंतु, आता या पदात आपल्याला रस नाही. कोणा नव्या व्यक्तीकडे या पदाची जबाबदारी सोपवायला हवी असे मी त्यांना सांगितले.

Opposing dynasticism, Congress Legal Cell National President Vivek Tankha resigns

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण