ऑलिम्पिक स्पर्धेत दोनदा पदके जिंकून देशाची मान उंचावणारा कुस्तीपटू सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सुशील कुमार सहभागी असल्याचा आरोप आहे. मात्र हा आरोप झाल्यापासून सुशील कुमार फरार झाल्यामुळे त्याच्याभोवतीचे संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी ही घोषणा केली आहे. Olympic medalist wrestler Sushil Kumar absconding after being charged with murder of a 23-year-old former junior national wrestling champion Sagar Rana
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विक्रमी दोनवेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीवीर सुशील कुमार आणि अन्य नऊ जणांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा माजी विजेता 23 वर्षीय सागर राणा याच्या खुनाचा आरोप या दहा जणांवर आहे.
फरार सुशील कुमारची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सुशील कुमारचा साथीदार शारीरिक शिक्षण प्रशिक्षक अजय कुमार हा सुद्धा फरार असून त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी पन्नास हजारांचे इनाम जाहीर केले आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या फाईलमध्ये सागर राणा खून प्रकरणी सुशील कुमारच्या सहभागाविषयीचा तपशील देण्यात आला आहे. खुनाच्या आरोपात फरार असलेल्या सुशील कुमार याने लंडन ऑलिम्पिक (2012)मध्ये रौप्य तर बिजिंग ऑलिम्पिक (2008)मध्ये कास्यं पदकाची कमाई केली होती. व्यक्तिगत दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा सुशील कुमार हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना वायव्य दिल्लीच्या डीसीपी उषा रंगरानी यांनी सांगितले, “सुशील कुमार आणि अजय कुमार यांना अटक करण्यासाठीची खबर आम्हाला देणाऱ्यास अनुक्रमे एक लाख आणि पन्नास हजार रुपयांचे इनाम आम्ही जाहीर केले आहे.”
युवा पहिलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशीलकुमार आणि अन्य नऊ जणांच्या अटकेसाठी दिल्ली न्यायालयाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले. दिल्ली पोलिसांनी त्या आधीच लूक-आऊट नोटिस काढली होती.
सागर राणाच्या हत्येनंतर मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलन 302 (खून), 365 (अपहरण) आणि 102-बी (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत सुशीलकुमार आणइ अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सुशील कुमार फरार आहे.
चार मे रोजी ग्रीको-रोमन प्रकाराच्या कुस्ती स्पर्धेत सागर राणा सहभागी झाला होता. त्यानंतर दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत प्राणघातक मारामारी झाली. यातच राणा मृत्यूमुखी पडला.
राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेतला माजी विजेता असणारा सागर राणा कुस्ती प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला होता. अतिरीक्त डीसीपी गुरुकबाळसिंग सिद्धू यांनी सांगितले की, मारामारीचे बळी ठरलेल्या सर्वांचे जबाब आम्ही घेतले.
त्या सर्वांनी सुशील कुमारचे नाव घेतले. त्याला पकडण्यासाठी आम्ही छापे टाकत आहोत. कुस्ती स्टेडियमच्या वाहनतळामध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स दलाल, सोनू सागर, अमित आणि इतरांच्यात भांडण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App