NSA अजित डोवाल : जैश ए मोहम्मद कडून आधी रेकी, नंतर सुरक्षाभंग करून घरात घुसखोरीचा प्रयत्न!!; संशयिताला अटक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : NSA अर्थात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात संशयित व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच पकडला गेला. या व्यक्तीने अजित डोवाल यांच्या घरात कार नेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबविले आणि ताब्यात घेतले.  NSA Ajit Doval: Reiki from Jaish-e-Mohammed first, then attempt to break into the house by breaching security !!; The suspect was arrested

त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम त्याची चौकशी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी NSA अजित डोवाल यांच्या कार्यालयाची आणि घराची रेकी करण्यात आली होती. ही रेकी पाकिस्तानच्या जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांनी केली होती. जैश – ए – मोहम्मदचा दहशतवादी हिदायक मुल्ला याला अनंतनाग येथे अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून ही माहिती बाहेर आली होती. त्यानंतर NSA अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली होती.



आज तर बंगलोर आतली एक व्यक्ती गाडीसकट अजित डोवाल यांच्या घराच्या गेटमधून आत मध्ये गेली. सुरक्षारक्षकांनी पडल्यानंतर आपल्या शरीरात एक चीप आहे. आपल्यावर नियंत्रण करण्यात येत आहे, असे तो म्हणाला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन पूर्ण तपासणी केल्या झाल्यानंतर त्याच्या शरीरात कोणतीही चीप आढळली नाही. मात्र, या व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत असून काही वेळानंतर या संदर्भातले तपशील जाहीर करण्यात येतील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍यात हुसैनीवाला येथे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळली होती. हुसैनीवालाच्या उड्डाणपुलावर सुमारे 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा थांबून राहिला होता. तेथे काही शेतकरी आंदोलन करत असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे. मात्र या संदर्भात सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने गंभीर त्रुटी ठेवली होती. त्यांना आपला दौरा अर्धवट सोडून पुन्हा दिल्लीला यावे लागले होते .

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या बंगल्यात गाडी घेऊन एक व्यक्ती घुसते. आपल्या शरीरात चीप असल्याचे सांगते. ही घटना अत्यंत गंभीर आहे. याबाबत तपास सुरू आहे.

NSA Ajit Doval : Reiki from Jaish-e-Mohammed first, then attempt to break into the house by breaching security !!; The suspect was arrested

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात