संकटमोचक बॉबी नसणे ममता बॅनर्जींसाठी सर्वाधिक डोकेदुखी


केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बहचचीर्त नारद घोटाळ्यात तृणमूल कॉँग्रेसच्या तीन नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यातील फरीद हाकीम यांची अनुपस्थिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी सर्वाधिक डोकेदुखी आहे. ममता बॅनर्जी फरीद यांना बॉबी असे म्हणतात. ममतांसाठी कोणत्याही प्रश्नावर बॉबी संकटमोचक आहेत.Not having a troublemaker Bobby is the biggest headache for Mamata Banerjee


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बहचचीर्त नारद घोटाळ्यात तृणमूल कॉँग्रेसच्या तीन नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यातील फरीद हाकीम यांची अनुपस्थिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी सर्वाधिक डोकेदुखी आहे.

ममता बॅनर्जी फरीद यांना बॉबी असे म्हणतात. ममतांसाठी कोणत्याही प्रश्नावर बॉबी संकटमोचक आहेत.ममता बॅनर्जीयांच्या मंत्रीमंडळात परिवहन मंत्री असलेले फरीद हे सध्या नजरकैदेत आहेत.




गेल्या अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जी सातत्याने सांगत आहेत की फरीद हे घरी असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. कोरोनाचे व्यवस्थापन असो की चक्रीवादळाविरुध्द लढण्याची तयारी फरीद यांची मदत घेतली जात आहे.

याचे कारण म्हणजे फरीद हे ममता बॅनर्जी यांच्यासाठी संकटमोचक म्हणून काम करत आहेत. नगरविकासाचे प्रश्न असोत की अल्पसंख्यांकांशी संवाद साधणे असो फरीद ममतांची मदत करत असतात.

फरीद हे कोलकत्ताचे पहिले मुस्लिम महापौर आहेतच. त्याचबरोबर तारकेश्वर मंदिर विकास आराखड्याचे पहिले मुस्लिम अध्यक्षही होते. निवडणूक प्रचाराच्या काळात ममता बॅनर्जी राज्यभर दौरे करत असताना फरीद यांनीच कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती.

ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरुध्द आंदोलन केले तेव्हा फरीदच त्यांना आपल्या इलेक्ट्रिक मोपडवरून घरापासून आंदोलन स्थळापर्यंत घेऊन गेले होते.

नंदीग्राममध्ये प्रचाराच्या वेळी झालेल्या कथित हल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पाय दुखावला तेव्हापासून फरीद हेच ममतांची व्हिलचेअर ढकलताना दिसत होते.ममता बॅनर्जी यांच्याा कौटुंबिक अडचणीच्या वेळीही फरीद हेच धावून येतात.

ममता बॅनर्जी यांच्या आई आजारी होत्या त्यावेळी फरीद यांनीच त्यांना रक्त दिले होते. ममता आणि फरीद यांच्यात बहिणभावाचे नाते असल्याचे त्यांचे कुटुंबिय सांगतात.

फरीद यांची मुलगी प्रियदर्शिनी म्हणते माझे वडील हे ममता बॅनर्जी यांचे सहकारी नाहीत तर लहान भाऊ आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते दोघे भाऊबीज साजरी करतात. फरीद हे कधीही ममतांच्या मतांना विरोध करत नाहीत.

Not having a troublemaker Bobby is the biggest headache for Mamata Banerjee

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात