Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद भंग केली, मध्यावधी निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर

Nepal President dissolves Parliament, announces mid-term polls in November

Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद भंग करून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या आहेत. नेपाळमध्ये 12 आणि 19 नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका होणार आहेत. नेपाळ कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली या दोघांचेही सरकार स्थापनेचे दावे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी फेटाळले. नेपाळ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. Nepal President dissolves Parliament, announces Nepal mid-term polls in November


वृत्तसंस्था

काठमांडू : नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद भंग करून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या आहेत. नेपाळमध्ये 12 आणि 19 नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका होणार आहेत. नेपाळ कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली या दोघांचेही सरकार स्थापनेचे दावे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी फेटाळले. नेपाळ कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष या दोन्हींनी खासदारांच्या स्वाक्षर्‍यांसह राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांना एक पत्र सादर केले होते व त्यात नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. विरोधी पक्षातील नेत्यांच्या काही मिनिटेआधी ओली राष्ट्रपती कार्यालयात पोहोचले होते.

घटनेच्या अनुच्छेद (76 (5) नुसार ओली यांनी पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी आपल्या पक्षाच्या – सीपीएन-यूएमएलच्या 121 सदस्या आणि जनता समाजवादी पक्ष- नेपाळ (जेएसपी-एन) च्या 32 खासदारांनी समर्थनाचे पत्र सोपवले होते. दुसरीकडे, नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांनी 149 खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला होता. देऊबा पंतप्रधान पदाचा दावा सादर करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत राष्ट्रपती कार्यालयात पोहोचले होते.

ओली यांनी 153 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, तर देउबा यांनी त्यांच्या बाजूने 149 खासदार असल्याचा दावा केला. नेपाळच्या 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेत 121 जागांसोबत सीपीएन-यूएमएल सर्वात मोठा पक्ष आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 138 जागांची गरज असते.

Nepal President dissolves Parliament, announces mid-term polls in November

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात