शेतकरी संघटनांचे अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, आंदोलन मागे घ्यायचेय, चर्चेसाठी पंतप्रधानांना पत्रही पण…


बायकोवर रागावून निघून गेलेल्या एका नवऱ्याला घरी परतायचे असते. परंतु, माघार घेऊन परत गेलो तर आपले नाक कापले जाईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतात चरायला आलेल्या आपल्या म्हशीची शेपटी धरली आणि मागे जाऊ लागला. घरी पोहोचल्यावर म्हणाला अगं अगं म्हशी मला कोठे नेशी? अगदी तशीच अवस्था सध्या दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांची झाली आहे.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : बायकोवर रागावून निघून गेलेल्या एका नवऱ्याला   घरी परतायचे असते. परंतु, माघार घेऊन परत गेलो तर आपले नाक कापले जाईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतात चरायला आलेल्या आपल्या म्हशीची शेपटी धरली आणि मागे जाऊ लागला. घरी पोहोचल्यावर म्हणाला अगं अगं म्हशी मला कोठे नेशी? अगदी तशीच अवस्था सध्या दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांची झाली आहे. Farmers unions I want to withdraw the agitation, even a letter to the Prime Minister for discussion but …

अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोचार्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पुन्हा कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.कोरोना संकट काळात शेतकरी कुणाचेही आरोग्य धोक्यात घालत नाहीत. मात्र, हे आंदोलनही मागे घेऊ शकत नाहीत. कारण हे जीवन-मृत्यू आणि येणाºया पिढ्यांचा विषय आहे, असे श्म्हटले आहे.



नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने सरकारने परिपक्वता दर्शविली पाहिजे आणि शेतकºयांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेटाळलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे देशातील लोकशाही व मानवी नीतिमत्तेच्या विरोधात आहे. संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.

ज्या तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी फेटाळले आहे, ते कायदे कोणत्याही लोकशाही सरकारने रद्द केले असते. तसेच, आतापर्यंत शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती, असे किसान मोचार्ने म्हटले आहे. शेतकऱ्यांसोबत गंभीर आणि प्रामाणिक चर्चा पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही किसान मोचार्ने म्हटले आहे.

संयुक्त किसान मोर्चाची भूमिका बदलण्याचे कारण म्हणजे दोन आंदोलक शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू. त्याचबरोबर आंदोलनात ज्या गावातील शेतकरी सहभागी आहेत त्याठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या भारतीय किसान यूनियन या प्रमुख संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. प्रवक्ते भोपाल सिंह यांनी म्हटले आहे की देशावर कोरोनाचे भयंकर संकट आले आहे.

लोकांचे मृत्यू होत आहेत. कुंडली सीमेवरही दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलन समितीचा सदस्य या नात्याने मी आवाहन करतो की सध्यापुरते आंदोलन स्थगित करायला हवे. मात्र, भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.

नेत्यांचे काहीही म्हणणे असले तरी शेतकरी मात्र आता आंदोलनाला कंटाळले आहेत. त्याचबरोबर कोरोनाची धास्तीही त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आता किमान मानाने आंदोलन मागे कसे घेता येतील याचा विचार करत आहेत.

Farmers unions I want to withdraw the agitation, even a letter to the Prime Minister for discussion but …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात