‘लय भारी ते घणो चोखो’ चर्चा तर होणारच ! महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवप्रसाद नकाते ; राजस्थानचे IAS ऑफिसर ; वाचा यशोगाथा



  • कधी सारकलवरून कोरोनाचा आढावा,कधी रानावनातून फेरफटका ,कधी स्वतः शेतात काम तर कधी पाकिस्तानातून भारतात मृतदेह आणन्यासाठी धडपड .या ना त्या कारणावरून सदैव चर्चेत असतात .सदैव त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो .

  • ३ वेळा मिळालेली सरकारी नोकरी सोडून ठेवले एकच ध्येय , बनेन तर IAS ऑफिसरच, मग पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश .Shivprasad Nakate of Solapur in Maharashtra; IAS officer of Rajasthan; Read success stories

  • जिल्हा परिषद शाळेत शिकले, गावात कोचींग नव्हती म्हणून सेल्फ स्टडी केली, ३ नोकऱ्यात सलेक्शन झाले.

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : जेव्हा एखादी गोष्ट मनापासून ठरवली जाते ती पुर्ण करण्यासाठी हवी असते जिद्द …या जिद्दीला जेव्हा कठोर परिश्रमाची साथ मिळते तेव्हा तयार होतात शिवप्रसाद सारखे प्रशासकीय अधिकारी। २५ व्या वर्षी कलेक्टर बनलेले शिवप्रसाद मदन नकाते यांच्या यशाची गोष्ट. महाराष्ट्रातील सोलापूरमधील माडा गावात सामान्य शेतकरी परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील मदन नकाते एक सामान्य शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. लहान असताना वडिलांना लोकांच्या समस्येसाठी सरकारी कार्यालयात जाताना पाहिले, अनेक वेळेस त्यांच्यासोबत देखील गेले आणि आधिकारी होऊन लोकांसाठी काही करण्याचे ठरवले. मग माडा गावातील जिल्हा परिषद शाळेत १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले, त्या दरम्यान यूपीएससीची सिविल सर्विसेज एग्झाम क्लीअर करून आयएएस बनण्याचे स्वप्न पाहिले.

वडिलांच्या सल्याने मिळाली मदत
शिक्षणादरम्यान एकदा बीडीएस आणि दूसऱ्यावेळेस एमटेक करण्यासाठी आयआयटीची एंट्रेस टेस्ट पास केली. मुलगा डॉक्टर व्हावा अशी पालकांची इच्छा होती. पण आयएएस बनायचे होते त्यामुळे बीडीएस किंवा आयआयटीमध्ये अॅडमिशन घेतले नाही. ग्रामीण भाग असल्यामुळे कोचींगदेखीन नाही लावली. आत्मविश्वासासोबत सेल्फ स्टडी केली, आणि त्या दरम्यान फोनपासून लांब राहिलो. शाळेत असताना वडिलांनी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली होती त्याचा खुप फायदा झाला.

पहिल्याच प्रयत्नात बनले IAS
वृत्तपत्रांशिवाय त्यांनी १० तास रोज सिलॅबसच्या अभ्यास करायचे. २०१० मध्ये महाराष्ट्र प्रशासनिक सेवा, राज्य वन सेवा आणि सेंट्रल पोलिस फोर्समध्ये त्यांचे सलेक्शन झाले पण आयएएस बनण्याचे स्वप्न होते त्यामुळे या तिन्ही नोकऱ्यांना नकार दिला. त्यानंतर सेल्फ स्टडी करून २०१० मध्ये युपीएससी ची परिक्षी दिली आणि २०११ मध्ये त्याचा निकाल लागला  पहिल्याच प्रत्नात पास झाले.

२०१८ ची गोष्ट-

पाकिस्तानमध्ये मृत पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबासाठी बाडमेरचे (राजस्थान) जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते जणू देवदूतच बनले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी २६ वर्षांनंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील मुनाबाव -खोखरापार प्रवेशद्वार प्रथमच उघडून महिलेचा मृतदेह भारतात आणला गेला होता.विशेष म्हणजे याच काळात जिल्हाधिकारी नकाते यांच्या पत्नी दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या होत्या. त्यांच्यासोबत थांबणे आवश्‍यक असतानादेखील त्यांनी नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला.

“चांगले काम करण्याच्या संधी प्रत्येक ठिकाणी असतात. कोणतेही क्षेत्र असो चांगल्या भावनेने काम केल्यास यश तुम्हाला नक्कीच मिळते”
– शिवप्रसाद मदन नकाते

Shivprasad Nakate of Solapur in Maharashtra; IAS officer of Rajasthan; Read success stories

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात