तिकडे सुदूर काश्मीरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीविषयी जनजागृती आणि इकडे प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाचा अंधार…!!


वृत्तसंस्था

नाशिक – सारा देश कोरोना विरोधात लढत असताना तिकडे सुदूर काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती  करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि इकडे प्रगत महाराष्ट्रातल्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक जिल्ह्यात अज्ञानाचा अंधार अजून दूर व्हायला तयार नाही. Maharashtra: Residents of Raigadnagar village in Igatpuri hesitant to take COVID vaccines due to lack of awareness

एकीकडे जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील दोडू तालुक्यातील गार कटियास या छोट्या गावातील १२० वर्षांची आजी धोली देवी यांच्या अथक प्रयत्नांमधून संपूर्ण गावाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली असून गावाला कोरोनापासून मुक्त ठेवले आहे.

तर दुसरीकडे प्रगत असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील रायगडनगर या आदिवासी गावात ग्रामस्थ अज्ञानामुळे कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायलाच तयार होत नाहीएत. बरं ही बातमी सांगोवांगी आली असती, तर तिच्याकडे अफवा म्हणून दुर्लक्ष करता आले असते. पण एएनआयसारख्या वृत्तसंस्थेने एका वैद्यकीय अधिकारी महिलेच्या हवाल्याने ही बातमी दिल्याने त्याची दखल घेणे भाग आहे.

इगतपूरी तालुक्यात नाशिक – मुंबई महामार्गावर रायगडनगर हे गाव आहे. तेथे नाशिक जिल्ह्याची वैद्यकीय टीम लसीकरणासाठी पोहोचली तेव्हा ग्रामस्थांनी इथे कोरोना नाही. आम्ही कशाला लस टोचून घ्यायची म्हणून लसीकरणास नकार दिला. एवढेच नाही तर कोरोना नसताना लस टोचली तर आम्हाला कोरोना होईल, असे ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच ऐकविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी दवे यांनी ही मन विषण्ण करणारी माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

एकीकडे महाराष्ट्राच्या प्रगतीचे गोडवे गायचे. दुसरीकडे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडायचे उद्योग राज्य सरकारने चालविले आहेत आणि त्याचवेळी लसीकरणाविषयी पुरेशी जनजागृती करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करायचे हेच रायगडनगरच्या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे.

Maharashtra: Residents of Raigadnagar village in Igatpuri hesitant to take COVID vaccines due to lack of awareness

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात