कोरोना लसीच्या विक्रीतून नऊजण अब्जाधीश, पुण्याचे आदर पूनावालाही मालामाल ; 12.7 अब्ज डॉलर्सचे धनी


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तयार केलेल्या लसीच्या विक्रीतून नऊजण अब्जाधीश बनले आहेत. ‘ग्रुप पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ने हा दावा केला. त्यात पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची संपत्ती गतवर्षीच्या 2.2 अब्ज डॉलर्सवरून कोरोना काळात 12.7 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. Nine New Billionaires from corona vaccine sales,
Wealth Of Aaadar Poonawala Is 12.7 billion Dollars

‘ग्रुप पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ या संस्थेकडून कोविड-19 लसीचे पेटंट संपविले जावे, अशी मागणी केली जात आहे. नवीन अब्जाधीशांनी गरीब देशांना गरजेनुसार लस द्यावी. खर्चापेक्षा दीड पट अधिक पैसा कामाविला असल्याचे संस्थेने अहवालात म्हटले आहे.कोरोना लस विक्रीतून नऊ जणांच्या संपत्तीत 19.3 अब्ज डॉलर्सची अर्थात 141 कोटींची भर पडली आहे. अगोदरच अब्जाधीश असलेल्या अन्य आठ जणांच्या संपत्तीतसुद्धा 32.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या नऊ अब्जाधीशांच्या संपत्तीतून गरीब देशांतील संपूर्ण लोकसंख्येचे एकापेक्षा जास्त वेळा लसीकरण करणे शक्य आहे.

नवीन अब्जाधीशांच्या यादीत कोण ?

1 ) मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन बेन्सल अक्वल

2) फायझर बायोटेकचे प्रमुख उगर साहीन

3) कॅन्सीनो बायोलॉजिक्स या चिनी कंपनीचे तीन सह संस्थापक

4 ) सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची संपत्ती गतवर्षीच्या 2.2 अब्ज डॉलर्सवरून कोरोना काळात  12.7 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

5) कॅडिलाचे चेअरमन पंकज पटेल यांची संपत्तीसुद्धा 2.9 अब्ज डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

लसींवरील पेटंट हटविण्याची मागणी

लसींवरील पेटंट हटविल्यामुळे विकसनशील देशांमध्ये लस उत्पादन वाढविण्यास आणि जग साथमुक्त होण्यास मदत होईल, असे संस्थेचे तसेच गरीब देशांचेही म्हणणे आहे. अमेरिकेसारख्या देशांनी आणि पोप फ्रान्सिस यांनीही पेटंट हटविण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Nine New Billionaires from corona vaccine sales, Wealth Of Aaadar Poonawala Is 12.7 billion Dollars

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती