Nana Patole said that Poonawala should announce names of threatening leaders, Congress will take care of their safety

नाना पटोले म्हणाले, ‘अदर पुनावालांनी धमक्या देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करावीत, काँग्रेस त्यांना सुरक्षा देईल!’

Nana Patole :  देशात कोरोना महामारीचा कहर कायम आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला आपल्या कुटुंबासमवेत लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये पुनावालांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर खूप प्रेशर असून काही बड्या राजकीय नेत्यांनी धमक्या दिल्याचे म्हटले होते. पुनावालांच्या याच वक्तव्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. नाना पटोले म्हणाले की, पुनावालांनी भारतात यावे, त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल. त्यांना धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे त्यांनी जाहीर करायला हवीत. Nana Patole said that Poonawala should announce names of threatening leaders, Congress will take care of their safety


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात कोरोना महामारीचा कहर कायम आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला आपल्या कुटुंबासमवेत लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये पुनावालांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर खूप प्रेशर असून काही बड्या राजकीय नेत्यांनी धमक्या दिल्याचे म्हटले होते. पुनावालांच्या याच वक्तव्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. नाना पटोले म्हणाले की, पुनावालांनी भारतात यावे, त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल. त्यांना धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे त्यांनी जाहीर करायला हवीत.

धमकी देणाऱ्यांची नावे जाहीर करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लंडनमध्ये अदार पूनावाला म्हणाले की, मी आता भारतात येणार नाही. बड्या नेत्यांनी त्यांना धमकावले आहे. देशात कोणीही त्यांना हातही लावू शकणार नाही. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कॉंग्रेस घेईल. त्यांनी धमकावणाऱ्यांना समोर आणायला पाहिजे.

गत आठवड्यात पुनावालांना Y दर्जाची सुरक्षा

दरम्यान, सीरम प्रमुख अदर पुनावाला यांना गत आठवड्यातच वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. ते म्हणाले होते की, कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यावरून त्यांच्यावर खूप दबाव होता, त्यांना धमक्याही मिळत होत्या. याच कारणास्तव पुनावाला यांनी देश सोडून लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. नुकतेच केंद्रातील मोदी सरकारच्या वतीने पूनावाला यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. तथापि, पुनावालांनी अद्यापही कोणत्याही नेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी जर नावे जाहीर केली, तर माझे शिर कापतील. पुनावालांच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

Nana Patole said that Poonawala should announce names of threatening leaders, Congress will take care of their safety

महत्त्वाच्या बातम्या