India Corona Case Updates : देशात २४ तासांत ३,६८,००० नवीन रुग्णांची नोंद, ३४१७ मृत्यू; सक्रिय रुग्णसंख्या ३४ लाखांच्याही पुढे

India Corona Case Updates : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जीवघेणी बनत चालली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 3 लाख 68 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात तब्बल तीन लाख 732 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांच्याही पुढे गेल्याने चिंता जास्त वाढली आहे. India Corona Case Updates 368,000 new cases registered in India in 24 hours, 3417 deaths; active patients exceeds 34 lakh


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जीवघेणी बनत चालली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 3 लाख 68 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात तब्बल तीन लाख 732 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांच्याही पुढे गेल्याने चिंता जास्त वाढली आहे.

देशातील कोरोनाची सद्य:स्थिती

एकूण कोरोना रुग्ण – 1 कोटी 99 लाख, 25 हजार 604
एकूण बरे झालेले – 1 कोटी 62 लाख 93 हजार 003
एकूण मृत्यू – 2 लाख 18 हजार 959
सक्रिय रुग्णसंख्या – 34 लाख 13 हजार 642
एकूण लसीकरण – 15 कोटी 71 लाख 98 हजार 207

रविवारीच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी भारतात 3,92,488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 3689 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी 3,07,865 जण कोरोनोतून बरेही झाले होते.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून देशात सुरू झाली. 30 एप्रिलपर्यंत देशभरात 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 कोरोना डोस देण्यात आले आहेत. रविवारी 27 लाख 44 हजार 485 लसीचे डोस देण्यात आले. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांना लस देण्यात येत होती. आता 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे.

India Corona Case Updates 368,000 new cases registered in India in 24 hours, 3417 deaths; active patients exceeds 34 lakh

महत्त्वाच्या बातम्या