पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेल्या चीनबाबत मोदीजी चिडीचूप बसतात – औवेसींचा घणाघात


ओवैसी म्हणाले की पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात.Modiji angry over petrol-diesel prices and infiltrated China: Owaisi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावेळी ओवैसी म्हणाले की पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात.यात एक म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेला चीन याबाबत मोदीजी चिडीचूप आहेत. कारण ते चीनला घाबरतात.

ओवैसी म्हणाले की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, त्याबद्दल पंतप्रधान शांतच बसतात.पेट्रोल-डिझेलची सेंच्यूरी झालीय, मात्र पंतप्रधान म्हणतात, मित्रो, फिकर मत करो!



दुसरीकडे चीन आपल्या देशात तळ ठोकून बसला आहे. जेंव्हा पुलवामा हल्ला घडला तेंव्हा मोदींनी म्हटलं होतं की, घर में घुस के मारेंगे! आम्ही म्हटलं, मारा! मात्र, आता चीन आपल्या देशात घुसून बसला आहे,तरीही मोदी काहीच करत नाहीयेत.अस देखिल ओवैसी म्हणाले.

भारताचे पंतप्रधान चीनबाबत बोलायला घाबरतात. असं वाटतंय की, ते चीनच्या भीतीमुळे चहामध्ये सुद्धा चीनी (साखर) टाकत नसतील. अशी टीका देखील ओवैसी यांनी केली आहे.

Modiji angry over petrol-diesel prices and infiltrated China: Owaisi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात